शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

घाणेवाडी जलवाहिनी फुटली

By admin | Updated: May 21, 2014 00:18 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असतानाही अशा अडचणींमुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. इंदेवाडीनजीक जलवाहिनी फुटल्याने मध्यंतरी जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ मोठ्या प्रमाणात फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी गळती रोखण्यासाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पथकास तेथे पाठविले. जायकवाडी आणि घाणेवाडी या दोन्ही योजनांच्या जलवाहिन्या फोडण्याचे प्रमाण वाढत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक करूनही त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही. शहरात गेल्या वर्षभरात काही नवीन भागात जलवाहिनी अंथरण्यात आल्याने तेथे या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. (प्रतिनिधी) जलवाहिनी फोडणार्‍यांविरुद्ध पोलिस कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. मनोहरे म्हणाले की, यापूर्वीही जलवाहिनी फोडण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर पालिकेने अज्ञात नागरिकांविरुद्ध पोलिस कारवाई केलेली आहे. शहरातील नागरिकांनीही याबाबत नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मनोहरे यांनी केले आहे. गळती रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. जलवाहिनी फोडण्याचे प्रकार कायमस्वरूपी रोखण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. कारण जलवाहिनी फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. नगरपालिका प्रशासनाने जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेच्या संरक्षणासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जाते. कारण या योजनेसाठी दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल पालिकेला द्यावे लागते.