शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कचऱ्याचे वर्गीकरण नसल्याने नगरविकासच्या पथकासमोर मनपाची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:42 IST

पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

ठळक मुद्दे मिक्स कचरा थेट प्रक्रिया केंद्रावरपुढील अनुदानाबाबत साशंकता

औरंगाबाद : शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते, असा दावा मनपाने राज्य शासनाकडे केला आहे. नगरविकास विभागाने नेमलेल्या अधिकाऱ्यांचे पथक अचानक शहरात दाखल झाले. या पथकाने थेट कचरा प्रक्रिया केंद्रावर जाऊन महापालिकेच्या कारभाराची शहानिशा केली. १०० टक्के कचरा मिक्स पद्धतीने प्रक्रिया केंद्रावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मनपाच्या या नाचक्कीमुळे शासनाकडून पुढील अनुदान मिळेल किंवा नाही, यावर आता साशंकता व्यक्त केली जात आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे एक पथक दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून होते. या पथकाने शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली.  चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पावर शहरातून मिक्स कचरा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मनपाने शासनाकडे केलेले दावे किती फोल आहेत, हे उघडकीस आले. मिक्स कचऱ्यावर मनपा अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरेही देता आली नाहीत.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने मनपाला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील २५ कोटी रुपये मनपाला देण्यात आले. यातून चिकलठाणा येथे प्रकल्प उभा राहिला. नक्षत्रवाडी, पडेगाव प्रकल्प उभारणे सुरू आहे. मनपाने आता सुधारित प्रस्ताव सादर करून हे सर्व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १४२ कोटी रुपये लागणार असल्याचे शासनाला म्हटले आहे. याची शहानिशा करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर, उपसचिव सुधाकर बोबडे यांच्या पथकाने पाहणी केली. 

कंपनीच्या चुका मनपाच्या पथ्यावरशहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा जमा करण्यासाठी मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. कंपनी शहरात जिथे कुठे कचरा साचलेला दिसेल तेथील तो उचलून नेत आहे. ४या कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात विटा, दगड, टायरचे तुकडे टाकणे सुरू केले आहे. कंपनी शंभर टक्के मिक्स कचरा प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकत आहे. कंपनीच्या चुकांचे परिणाम मनपाला भोगावे लागत आहेत.

पथकाकडून नाराजीस्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर आणि उपसचिव सुधाकर बोबडे यांनी राज्य शासनाने दिलेला २५ कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च केला याची तपासणी केली. या पथकाच्या अहवालावरच पुढील टप्प्यातील निधी अवलंबून आहे. पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी