शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या भूमिकेमुळे डॉक्टर संभ्रमात

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

सतीश जोशी , परभणी आगामी विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात लागणार असल्या तरी आतापासूनच इच्छुकांना वेध लागले आहेत़

सतीश जोशी , परभणीआगामी विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात लागणार असल्या तरी आतापासूनच इच्छुकांना वेध लागले आहेत़ सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार अंदाज घेत असून, त्या दृष्टीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हालचाली पहावयास मिळत आहेत़ या निवडणुकीत विद्यमान आ़ सीताराम घनदाट यांचा पक्ष कोणता असेल याचा अंदाज येत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ मधुसूदन केंद्रे संभ्रमात आहेत़ परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड असे चार विधानसभा मतदारसंघ़ परभणी आणि पाथरीत शिवसेनेची तर जिंतूरमध्ये काँग्रेस तर गंगाखेडमध्ये अपक्ष उमेदवाराने मागच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती़ जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडकडे बघितले जाते़ मागच्या निवडणुकीत अनेक जण रिंगणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भाजपाचे डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि अपक्ष आ़ सीताराम घनदाट यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती़ विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या आरक्षणानंतर २००९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटला असतानाही कुठल्याही जाती-पातीचे, धर्माचे, पक्षाचे राजकारण न चालता मतदारांनी ऐतिहासिक निकाल दिला होता़ घनदाट यांनी वरपूडकर आणि डॉ़ केंद्रे यांचा दणदणीत पराभव करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला़ यावेळी परिस्थिती बदलली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेला जवळपास ५४ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती़ त्यामुळे भाजपाकडून निवडणूक लढविण्यास गणेशराव रोकडे, विठ्ठलराव रबदडे, रामप्रभू मुंडे हे इच्छुक आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मध्यंतरी गंगाखेड शुगर्सचे रत्नाकर गुट्टे यांचे नाव चर्चिले जात होते़ परंतु, लोकसभा निवडणुकीत ते कुठेही नजरेस न पडल्याने त्यांचा पक्ष कोणता, असाही प्रश्न आहे़ तसेच माजी खा.सुरेश जाधव हे देखील राकाँकडून इच्छुक आहेत. गंगाखेड मतदारसंघामध्ये गंगाखेडसह पूर्णा आणि पालम तालुक्यांचा समावेश होतो़ याशिवाय या मतदारसंघात मराठा मताप्रमाणेच वंजारी, हटकर, धनगर या ओबीसी मतदारांचेही प्राबल्य आहे़ या मतदार संघावर भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांचे प्रभुत्व होते़ परंतु, त्यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे़ एकंदरीत काय तर या मतदारसंघात आजही तिरंगी लढतीची अपेक्षा आहे़ महायुतीचा उमेदवार कोण,यानंतरच निकालाविषयी अंदाज बांधता येतील़ आ़ सीताराम घनदाट यांचीच भूमिका काय असेल हे स्पष्ट होत नाही़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ़ घनदाट यांनी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, जिंतूरचे काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांच्या हातात हात घालत महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांचा उघडउघड प्रचार केला होता़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार असतील की पूर्वीप्रमाणेच अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, याचा अंदाज आजतरी येत नाही़ गतवेळेचे भाजपाचे डॉ़ मधुसूदन केंद्रे हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असतील़ सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी निश्चितच त्यांचे सहकार्य डॉ़ मधुसूदन केंद्रे यांच्या पाठीशी असेल़