शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

दारूला स्पर्शही नसल्याने किनगावात सौख्याची परंपरा...

By admin | Updated: June 5, 2014 00:46 IST

संजीवकुमार देवनाळे, किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून,

संजीवकुमार देवनाळे, किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांमध्ये सौख्याची परंपरा आजही कायम आहे. किनगाव हे लातूर, परभणी, बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरचे गाव असून, या तिन्ही जिल्ह्यांतील गावांचा थेट संपर्क किनगावाशी येतो. जिल्ह्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्री, बिअर बारच्या दुकानासाठी स्पर्धा लागली असली, तरी किनगावमध्ये मात्र वयोवृद्ध व जाणकार मंडळींनी अद्यापही अवैध दारू विक्रीला गावात येऊ दिले नाही. मधुकर मुंढे यांनी १९७७ ते १९९६ दरम्यान, गावच्या लोकप्रतिनिधींची भूमिका सांभाळली. सलग तीनवेळा ते बिनविरोध सरपंच झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गरीब लोकांसाठी दीडशे घरे बांधून दिली व त्या घरांना ‘ठाकरेनगर’ असे नाव दिले. याच काळात गावाची बाजारपेठ ओळखून उदगीर येथील एका व्यावसायिकाने अवैध दारू विक्रीचे दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळीही गावातील लोकांनी त्याला विरोध करून त्याचा उद्देश हाणून पाडण्याचे काम केले. गावातील सामाजिक कार्याने प्रेरित झालेले मधुकर मुंढे, मैनोद्दीन देशमुख, देवेंद्र आमले यांनी गावात अवैध दारू विक्रीला स्थान देऊ नये, यासाठी त्यावेळी आमरण उपोषण केले. पण; त्यांच्या या सामाजिक कार्याला त्यावेळी दाद ना फिर्याद, अशी परिस्थिती झाली. तरीही जिद्दीने कार्य केल्यामुळे शासनाला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर मात्र कोणी तसा प्रयत्न करण्याचेही धाडस केले नाही. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव... अहमदपूर तालुक्यातील किनगावात आनंदात जगणार्‍या नागरिकांना या अवैध व्यवसायाची दृष्ट लागू नये, या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी किनगाव ग्रामपंचायतीमध्ये बहुमताने दारू विक्री कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच बाहेरील कोणी व्यक्ती या उद्देशाने आला तर त्यालाही ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असाही निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून गावामध्ये सौख्याची परंपरा राबत असून, तीच परंपरा कायम ठेवण्याचे काम माजी सरपंच त्रिवेणी लव्हराळे, शिवाजी कांबळे, लताताई मुंडे आदींनी केली आहे. तसेच यापुढील कालावधीतही ती परंपरा पुढे सांभाळण्याचे काम सरपंच विठ्ठलराव बोडके करीत आहेत.