शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी ९ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

संजय कुलकर्णी , जालना ग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ निधीअभावी या योजना बंद असून त्यासाठी टँकरवर खर्च सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असून काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठ््याची सोय व्हावी, म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. परंतु त्यापैकी ९ योजना केवळ निधीअभावी अनेक दिवसांपासून बंद आहे. जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्यास टँकरच्या पाण्यावरच या ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.या नऊ गावांमध्ये भोकरदन तालुक्यातील आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, अंबड तालुक्यातील रेणापुरी, कर्जत, मंठा तालुक्यातील माहोरा व परतूर तालुक्यातील बामणी, कावजवळा, वलखेडा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, रेणापुरी, कर्जत आणि कावजवळा येथील योजना देखभाल दुरूस्तीअभावी बंद आहे. तर पुरेशा पाण्याचा उदभव नसल्याने माहोरा, बामणी व वलखेडा येथील योजना बंद आहेत.या योजनांच्या दुरूस्तीसाठी सरासरी ५४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने सदरील योजना सुरू झालेल्या नाहीत.४जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. त्यातील १०१९ योजना सुरू आहेत. परंतु २६२ गावे व वाड्यांमध्ये अद्याप नळयोजनांची कामे झालेली नाहीत. आगामी काळात ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.४यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना विचारणा केली असता सदरील नऊ योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार यांच्याकडे त्यासाठी ५४ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचेही तांगडे यांनी सांगितले.