शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकवरील कपाशी धोक्यात

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे.

भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. एकूणच पावसामुळे शेतकरी तसेच व्यापारीवर्गातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्यात गेल्या वर्षी १ जूनलाच पिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी जून महिना संपत आला तरीसुध्दा एकही मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, सर्वच ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांनी ठिबक सिंचनावर कपाशी, मिरचीची लागवड केली, ती पिके पिवळी पडत आहे. वाढ खुंटली आहे. उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे. तालुक्यात खरीप पेरणी खोळंबली आहे. भोकरदन परिसरातील रामेश्वर सोनाजी राऊत यांनी गट नंबर २९ मध्ये २० मे रोजी ८ एकरमध्ये कपाशीची लागवड केली. पीकसुध्दा चांगले जोमदार आले. मात्र लागवडीनंतर २० दिवसांनी कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. तसेच वाढ खुंटली आहे. अनेक फवारण्या केल्या. खत दिले तरीसुध्दा कपाशीचा पिवळेपणा गेलेला नाही. सदर सीडस् कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषधी फवारणी करण्यास सांगितले. आठ दिवसांत पीक सुधारेल याची हमी दिली आहे. तसेच त्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडेसुध्दा धाव घेतली. मात्र कृषी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तालुका कृषी अधिकारी व्यवहारे म्हणाले, आमच्याकडे शेतकऱ्याने अर्ज दिलेला आहे.दोन तीन दिवसांमध्ये बदनापूर येथील तज्ज्ञांमार्फत कपाशी पिकाची तपासणी करण्यात येणार आहे.दरम्यान, पाऊस लांबत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गातून तीव्र चिंंता व्यक्त केली जात आहे. बियाणे तसेच इतर बाजारात शुकशुकाट आहे. बियाणे व्यापाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन साहित्य तसेच बियाणांची खरेदी केली. मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने बाजारात शुकशुकाट आहे. पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)दिवसा ऊन रात्री चांदणेपरतूर: दिवसा जोराचा वारा, कडाक्याचे उन, रात्री चांदणे भर पावसाळ्यात असे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून संपत आला असला तरी पावसाचा पत्ताच नाही. पावसाळ्यातही उन्हाळ्याच्या खुणा कायम आहेत. उन्हाचा कडाका, जोराचा वारा, यामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी पेरणी योग्य जमिनी करून ठेवल्या असल्या तरी, पावसाचा पत्ताच नाही, अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतं काळीभोर आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कापसाची लागवड केली आहे. पाउसच नसल्याने ठिबकसाठीही पाणी कमी पडत असल्याने हे पिके माना टाकत आहेत. एकूणच पावसाने दडी मारल्याने व पेरणीची वेळ निघून जात असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.