शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालकपदाचा ‘खो-खो’चा खेळ गुरुवारीही (दि.२८) सुरूच होता. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. मात्र, डॉ. दिगंबर नेटके यांनी सायंकाळी उशिरापर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. ते शुक्रवारी (दि.१) पदभार घेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजयश्री सूर्यवंशी यांनी पदभार सोडला : दिगंबर नेटके आज पदभार घेण्याची शक्यता

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालकपदाचा ‘खो-खो’चा खेळ गुरुवारीही (दि.२८) सुरूच होता. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. मात्र, डॉ. दिगंबर नेटके यांनी सायंकाळी उशिरापर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. ते शुक्रवारी (दि.१) पदभार घेण्याची शक्यता आहे.विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी सहा महिन्यांपूर्वी डॉ. साधना पांडे यांच्याकडून डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला होता. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात तत्कालीन प्रभारी परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा पदभार काढला. हा पदभार घेण्यास विद्यापीठातील एकही प्राध्यापक पुढे येत नसल्यामुळे तात्पुरता पदभार डॉ. पांडे यांच्याकडे देण्यात आला. शेवटी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याकडे पदभार देण्यात आला. सुरुवातीचे दोन-तीन महिने त्यांना परीक्षा विभागातील खाच-खळगे समजून घेण्यातच गेले. एका परीक्षेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू असतानाच त्यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढण्यात आला. याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. कुलगुरूंनी डॉ. सूर्यवंशी यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतरच पदभार सोडणार अशी भूमिका घेतली. कुलगुरू दौºयावरून परतण्यास दोन दिवस लागणार असल्यामुळे मी मेलद्वारेच पदभार सोडत असल्याचे कळवून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. कुलगुरूंनी दिलेली वागणूक अवमानकारक आहे. महिला दिनाची ही दिलेली भेट असल्याची कडक टीकाही त्यांनी पदभार सोडताना केली. पदभार घेण्यास कोणीही तयार नसताना माझ्या माथी मारले आणि पाठीशी उभे राहण्याऐवजी सोयीनुसार पदभार काढून घेतला. हा त्यांचा अधिकार असला तरी किमान सांगायला तरी पाहिजे होते. अनेक वेळा मोबाईल केला, त्यासही तीन दिवसांत कुलगुरूंनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे पदमुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नेटके तिसऱ्यांदा होणार प्रभारी संचालकपरीक्षा विभागाच्या प्रभारी परीक्षा संचालकपदाचा पदभार डॉ. दिगंबर नेटके तिसºयांदा स्वीकारणार आहेत. साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने परीक्षेत केलेल्या गैरप्रकारामुळे डॉ. नेटके यांना पहिल्यांदा पद सोडावे लागले. यानंतर पुन्हा त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटल्याप्रकरणी त्यांच्याकडून दुसºयांदा पदभार काढून घेतला. तरीही तिसºयांदा पदभार घेण्यास डॉ. नेटके तयार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षा संचालकपदाच्या मुलाखतीमध्ये डॉ. नेटके यांना कुलगुरूंनी अपात्र ठरविलेले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ