संशय उध्वस्थ करी संसार; पत्नी, अडीच वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:00 IST2023-01-09T13:58:26+5:302023-01-09T14:00:11+5:30

चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नी आणि मुलाची हत्या

Doubt destroys the family; Husband surrenders after killing wife and 2.5 yr son | संशय उध्वस्थ करी संसार; पत्नी, अडीच वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीचे आत्मसमर्पण

संशय उध्वस्थ करी संसार; पत्नी, अडीच वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीचे आत्मसमर्पण

औरंगाबाद: शहरातील कांचनवाडी परिसरात दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलाची चार्जरच्या वायरने आणि नायलॉंन दोरीच्या सहय्याने गळा आवळून खून केला. आरती मस्के (२५ ) व निशांत मस्के अशी मृतांची नावे आहेत. तर समीर मस्के (३० ) असे आरोपीचे नाव आहे.  

याबाबत प्राथमिक माहितीनुसार, शहरातील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि अडीच वर्षीय मुलासोबत राहत होता. समीर कायम पत्नीवर संशय घेत असे. यातून त्यांचे अनेकदा वाद होत. रविवारी देखील त्या दोघांमध्ये वाद  झाले. यातून संतापलेल्या समीरने चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नी आरती आणि अडीच वर्षीय मुलगा निशांत यांचा खून केला. त्यानंतर आरोपी समीरने स्वतःहून ११२ क्रमांकारावर फोन करून पोलिसांनी हत्या केल्याची माहिती झाली. यावरून सातारा पोलीस घटनास्थळी पोहचली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले.

Web Title: Doubt destroys the family; Husband surrenders after killing wife and 2.5 yr son