शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आणखी शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये- शिंदे

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

औंढा नागनाथ : शासनाने आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.

औंढा नागनाथ : मराठवाड्यात पडलेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर भिषण दुष्काळ ओढावला असून, नैराश्येपोटी आतापर्यंत ६० च्या वर शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याने शासनाने आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे केली आहे. शिंदे हे औंढा येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने सध्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी नऊ आमदारांचे पथक संपूर्ण मराठवाड्यात फिरणार आहेत. पाऊस नसल्याने उभी पिके हातची गेली आहेत. काही ठिकाणी पाणी असूनही वीज नसल्याने पर्याय उरला नाही. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.आत्महत्येचे सत्र वाढत चालले असून, मराठवाड्यात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही दुर्देवी बाब आहे. दुष्काळ जाहीर करून या भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देऊन मदत जाहीर करावी, नसता या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप सरकारच्या माथी आल्याशिवाय राहणार नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सरकार स्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसताना लातूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी स्वत: दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असून, त्यांनी त्यांचा विशेष अधिकाराचा वापर करून मराठवाडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिंदे यांनी करून येत्या नागपूर विधानसभा अधिवेशनात सेना याबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.यावेळी माजी आ. गजानन घुगे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरूसे, जि.प.अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, पं.स.सभापती राजेंद्र सांगळे, उपसभापती अनिल देशमुख, अंकुश आहेर, ज्ञानेश्वर झटे, दत्तराव दराडे, उद्धवराव गायकवाड, बबन इधारे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)