शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर अडत लादू नये

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते.

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद

औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते. मुळात अडत कोणाकडून घ्यावी, यासंदर्भात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात स्पष्टता नाही. परिणामी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडूनच अडत घेतली जात आहे. कृषी उत्पादन व विक्री यासंदर्भात कायद्यात व्यापक प्रमाणात सुधारणा करावी, प्रत्येक नियमाचे स्पष्ट निर्देश असावेत व अडत शेतकऱ्यांवर लादू नये, असा सूर लोकमतच्या वतीने आयोजित चर्चासत्रातून निघाला. या चर्चासत्रात शेतकरी, अडत व्यापारी, लोकप्रतिनिधी, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ यांनी आपले विचार मांडले. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी ‘अडत्याने शेतकऱ्यांकडून अडत न घेता खरेदीदारांकडून वसूल करावी’ असा आदेश काढला आणि राज्यात हा मुद्दा मागील आठवडाभर गाजला. या आदेशाच्या विरोधात राज्यातील ७० हजार अडत्यांनी संप पुकारला. अडत्यांची एकजूट पाहून सरकारने त्वरित आपला आदेश तात्पुरता मागे घेतला. ‘अडत’ या मुद्यावर लोकमतने गुरुवारी चर्चासत्र घडवून आणले. यात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी, अडत, खरेदीदार, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी डॉ.सुभाष माने यांनी ‘शेतकऱ्यांकडून अडत घेऊ नये’ हा आदेश काढला होता. त्याचे सर्वांनी स्वागत केले. राज्यभरात अडत व्यापारी या निर्णयाच्या विरोधात असले तरी जाधववाडीतील अडत व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अडत शेतकऱ्यांऐवजी कोणाकडून घ्यावी, याचा स्पष्ट उल्लेख आदेशात केला नाही, याकडेही अडत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शेतकरी व व्यापाऱ्यांना जोडणारा अडत्या हा धागा आहे आणि सध्याची विक्री पद्धतीही सक्षम असून, फक्त आपल्यासोबत ‘शेतकऱ्यां’चे हित साधले जावे ही मानसिकता प्रतिनिधी, अडते, व्यापाऱ्यांनी आपल्यात रुजवावी, असाही सल्ला शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्याकडून अडत्याने अडत वसूल करू नये, तर खरेदीदाराकडूनच अडत वसूल करावी. हमीभावापेक्षा बाजारात कमी दर मिळत असला तर सरकारने व बाजार समितीने स्वत: हमीभावात शेतीमाल खरेदी करावा. कृषी विषयक दीर्घकालीन व्यापक धोरण आखावे व कायदे, नियमात स्पष्टता आणावी, अशा सूचना शेतीतज्ज्ञांनी मांडल्या.