शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

By admin | Updated: April 16, 2016 23:53 IST

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा १९ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे़

चैत्री यात्रा : प्रशांत नारनवरे यांच्या सूचनातुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा १९ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे़ या यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी दिल्या़चैत्री यात्रेनिमित्त शनिवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते़ यावेळी पोनि माधव गुंडीले यांनी मातंगी देवी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत, मोटार सायकल पार्किंग व्यवस्था करावी चारचाकी पार्किंग व्यवस्था असली तरी पावत्या फाडल्या जात नाहीत, दीपक चौकात पार्किंगकडे जाण्याचा मार्गावर सूचनाफलक लावावे, मेन गेटवर आळीपाळीने कर्मचारी ठेवावेत आदी मुद्दे मांडले़ यावेळी जिल्हाधिकारी नारनवरे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, या समितीने उपाययोजनांबाबत सर्वे करावा, समितीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंदीर प्रशासनासह इतर अधिकारी राहावेत, २४ तास विद्युत व्यवस्था करावी, डिपींची दुरूस्ती करावी, मंदिरात पाण्याची सुविधा करावी, पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने करावी, पालिका प्रशासनाने शहर स्वच्छता ठेवावी, पार्किंग व्यवस्था करावी, विना नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करावी, मातंगी देवी मंदिराकडील अतिक्रमण हटवावे, आरोग्य विभागाने दोन रूग्णवाहिका तैनात कराव्यात, २४ तास आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवावे, हॅकींग झोन तयार करून व्यापाऱ्यांना व्यवस्था करून द्यावी बांगड्या विक्री करणाऱ्या महिलांची व्यवस्था करावी आदी सूचना केल्या़बैठकीस डॉ़ तेजस चव्हाण, तहसीलदार काशिनाथ पाटील, मंदीरचे तहसीलदार सुजित नरहिरे, नगराध्यक्षा अ‍ॅड मंजुषा मगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले, डॉ़ धनंजय चाकूरकर, डॉ़ बेलापट्टे, पोनि माधव गुंडीले यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते़बैठक : जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा‘मी आय हेल्प यू’मंदीर प्रशासनाने ‘मी आय हेल्प यू’ अशा स्वयंसेवक कर्मचारी नेमावेत़ हे स्वयंसेवक कर्मचारी भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्नशील रहावेत, पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या़‘बॅनर ऐवजी पाणी द्या’भीषण पाणीटंचाईच्या काळात चैत्री यात्रा भरत आहे़ त्यामुळे शहरासह परिसरातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह संघटनांनी डिजिटल बॅनर लावण्याऐवजी भाविकांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले़