शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयास लातुरात जागा मिळेना

By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST

सितम सोनवणे , लातूर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ च्या ब्रहत आराखड्यात लातूर जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर तसेच नव्या रुग्णालयाची घोषणा करण्यात आली़ यात

सितम सोनवणे , लातूरराज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ च्या ब्रहत आराखड्यात लातूर जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर तसेच नव्या रुग्णालयाची घोषणा करण्यात आली़ यात लातूरला नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे़ पण या रुग्णालयास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक हे जागेच्या प्रतिक्षेत असून या वर्षी हे रुग्णालय चालू होईल कि नाही अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे़राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील गरीब रुग्णासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी १७ जानेवारी २०१३ ला जिल्हा रुग्णालय व ट्रामा केंद्र जिल्हा भरात सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ त्यातील काही ट्रामा केंद्र सुरु ही झाले आहे़ पण लातूर जिल्ह्यासाठी १०० खाटाचे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आसनारे जिल्हा रुग्णालय व कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाचे २००७ मध्ये वैद्यकिय महाविद्यालयाकडे चल, अचल साधनांसह हस्तांतरीत करण्यात आले आहे़ तेव्हापासून लातुरात जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय नसल्याने आरोग्य विभागाने २०११ मध्ये १०० खाटाचे स्त्री रुग्णालयास मंजुरी देवून ते त्याचवर्षी लेबर कॉलनी येथे सुरुही करण्यात आले आहे़ त्याचा फायदा स्त्री रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत आहे़ ग्रामीण भागातील महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ ही घेताहेत़ पण जिल्हा रुग्णालयास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ बी़एस़ कोरे हे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे मागील ९ महिण्यापासून पाठपूरावा करत आहेत़ त्या मुळे जिल्हा रुग्णालय जागेच्या प्रतिक्षेत आहे़ जागा मिळाल्यानंतरच पुढील हालचालीना वेग येतो़ त्यानंतर रुग्णालयाचे काम चालू करण्यासाठी तसेच इमारत उभारण्यासाठीचे प्रयत्न केले जातात़ त्यानंतर स्टाफ मान्यता आदी बाबीची पूर्तता करण्यात तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो़