शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पाऊस

By admin | Updated: August 29, 2014 01:27 IST

नांदेड: तीन महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले असून दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात

नांदेड: तीन महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले असून दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ असे असले तरी अद्याप पावसाची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ २६ टक्केच पाऊस झाला आहे़ यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले़ जुन, जुलै व आॅगस्ट या महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तीबार पेरण्या करण्याची वेळ आली़ जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ पोळ्यापर्यंत पावसाने पाठ दाखविल्याने शेतकरी चिंतेत होता़ मात्र ऐन पोळ्याच्या दिवशी पावसाने हजेरी लावत पुनरागमन केले़ त्यानंतर जिल्ह्यात २६, २७ व २८ या तिन्ही दिवशी दमदार पाऊस झाला़ २७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या एकूण पावसाची २२७़७१ मि़ मी तर २८ रोजी ३४७़ ८५ मि़ मी़ नोंद झाली़ १ जून ते २७ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २२७़७१ मि़ मी़ पाऊस झाला़ १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ९५५़ ५५ मि़ मी़ पाऊस पडतो़ त्यानुसार २६़ ११ टक्के पाऊस पडला आहे़ मागील वर्षी तीन महिन्याच्या कालावधीत ८५२़ ०९ मि़ मी़ पाऊस पडला होता़ तर २०१२ मध्ये ४५४़४८ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद झाली होती़ या आकडेवारीवरून पावसाची कमतरता अजूनही जाणवत आहे़ परंतु उशिरा का होईना पावसाने सुरूवात केल्यामुळे सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पावसाची प्रतिक्षा होत आहे़ तसे झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़ यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद माहूर, मुखेड तालुक्यात झाली आहे़ तर सर्वात कमी पाऊस मुदखेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, बिलोली या तालुक्यात झाला आहे़ या तालुक्यात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची नोंद पुढील प्रमाणे, नांदेड - २५२़८५ मि़मी़, मुदखेड - १७७़३४, अर्धापूर - १७१़६८, भोकर - २५०़९५, उमरी - २७६़०१, कंधार - २०४़४७, लोहा - २१९़६७, किनवट - २६७़१०, माहूर - ३०८़६२, हदगाव - १८६़२६, हिमायतनगर - १७३़०४, देगलूर - २१३़०१, बिलोली - १८२़४०, धर्माबाद - २१५़३३, नायगाव - २३८़६०, मुखेड - ७९६़ ६७़ (प्रतिनिधी)