शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माहुरात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली क्रीडा संकुलासाठी जागा

By admin | Updated: March 20, 2016 23:46 IST

श्रीक्षेत्र माहूर : वर्षानुवर्षे रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निकाली काढत

श्रीक्षेत्र माहूर : वर्षानुवर्षे रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निकाली काढत क्रीडा संकुल बांधकामासाठी गायरान जमीन गट क्ऱ २ मधील ६ एकर १० गुंठे जमीन क्रीडा संकुल बांधकाम करण्यास ५ मार्च २०१६ रोजी मंजुरी दिल्योन आ़ प्रदीप नाईक यांच्यासह तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार व मान्यवरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरात भव्य क्रीडा संकुल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़गेल्या अनेक वर्षांपासून शहरात जलतरणिका, व्यायामशाळा, रनिंग ट्रॅक, टेनिस, कराटे, बॉक्सिंगसह अद्ययावत क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉलचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी खा़ राजीव सातव, आ़ प्रदीप नाईक, नगराध्यक्षा गौतमी कांबळे, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, प्रा़राजेंद्र केशवे, सुरेश गिऱ्हे, यासह गेल्या दोन वर्षापासून माहूरचे तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी पाठपुरावा सुरू केला होता़ याप्रश्न लोकमतनेही वेळोवेळी क्रीडा संकुल व्हावे याबद्दल वृत्त प्रकाशित करून प्रकरण लावून धरले होते़ तसेच माहूर भेटीत जिल्हाधिकाऱ्यांना मान्यवरांनी भेट घेवून याबाबत लेखी निवेदन दिले होते़ त्या अनुषंगाने आ़ नाईक यांनी तहसीलदार डॉ़बिरादार यांच्यासमवेत वनविभागाच्या कार्यालयामागील गायरान जागेची पाहणी करून येथेच क्रीडा संकुल व्हावे यासाठी पत्र दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसीलदार यांना आदेश देवून भोगाधिकार मूल्यरहीत सारामाफीने जमिनीचा आगावू ताबा देण्यात येत असल्याचे विहित करून सदरील जागेचा क्रीडा संकुलासाठीच उपयोग करावा, सदरील जमीन दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरता येणार नसून सदरील जमिनीवर प्रत्येक ५० फुटामागे एक झाड लावावे व नगररचना विभागाचे नियम अटीनुसार यावर बांधकाम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत़ (वार्ताहर)