शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त पुन्हा गाजले आखाडा बाळापूर

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

हिंगोली : मागील अनेक सभांमध्ये गाजलेला आखाडा बाळापूर येथील कामांतील अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला.

हिंगोली : मागील अनेक सभांमध्ये गाजलेला आखाडा बाळापूर येथील विविध विकास कामांतील अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. आजही सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र काही गोलमाल तर काही ठोस उत्तरे मिळाल्यानंतरच सदस्यांनी सभेचे कामकाज पुढे नेल्याने प्रशासन चांगलेच हतबल असल्याचे दिसले.यावेळी जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सभापती रंगराव कदम, राजाभाऊ मुसळे, मधुकर कुरुडे, निलावती सवंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे आदींची उपस्थिती होती.आखाडा बाळापूर येथील सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी १२.६४ लाखांचा निधी होता. त्यात दहा सिटस्च्या आठ कामांना मंजुरी होती. मात्र यातील एकही पूर्ण नाही. दोन-चार अर्धवट आहेत. प्रशासनानेही हे मान्य केले. लोकांच्या सोयीसाठी ही कामे आहेत. त्यामुळे ती एका महिन्यात पूर्ण करा अन्यथा संबंधितांवर फौजदारी दाखल करून अपहार निश्चिती करण्याची मागणी जि. प. सदस्य अनिल कदम यांनी केली. त्यात सभापती राजाभाऊ मुसळे यांनीही काही मुद्दे मांडले. तर शेवाळा मार्गावरील एन. ए. लेआऊट मंजूर नसताना नमुना आठला झालेल्या नोंदींवर काय कारवाई करता येईल, हे कायद्यातील तरतुदी तपासून केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. आखाडा बाळापूर येथे बांधण्यात आलेल्या २६ पैकी ७ बाजार ओटे पाडले. त्यात अज्ञातांविरुद्ध ग्रामसेवकाने तक्रार दिली. यावर ज्यांनी हे पाडले त्यांची नावे मिळवून अथवा संशयितांची नावे तक्रारीत देण्याचे सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. २0११-१२ मध्ये १३ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या ९५ हजारांच्या कचराकुंड्या पाहणीत आढळल्या नाहीत. मात्र पूर्वी त्या होत्या किंवा कधीच नव्हत्या याची तपासणी करण्यासाठी येत्या आठ दिवसांत पंचनामे करून स्थानिक नागरिकांच्या लेखी जबाबावरून कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. आखाडा बाळापूर ग्रामपंचायतने भाडेपट्ट्यावर दिलेले जवळपास सव्वा दोनशे गाळे सीईओंच्या मान्यतेशिवाय तसेच ग्रा. पं. च्या ठरावाशिवाय दिले. त्यामुळे त्याची चौकशी करून जे नियमात नाहीत, त्यांचे भाडेपट्टे रद्द करण्यास सांगण्यात आले. याशिवाय हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करणारा ठराव घेण्यात आला. तर इंचा येथील पाझर तलावाचे काम पूर्ण झाले असून त्यास ४५ लाखांची मान्यता होती. आणखी ७ लाखांची सुधारित मान्यता फेटाळण्यात आली. शिष्टमंडळ अथवा समितीच्या पाहणीअंती निर्णय घेण्यास सांगितले. आरोग्य केंद्रांत कर्मचारी व अधिकारी गैरहजर राहात असल्याचा मुद्दा विनायक देशमुख यांनी मांडला. तसेच हालचाल नोंद रजिस्टर बंधनकारक करण्याची मागणीही केली. त्यावर कार्यवाहीसह कर्मचाऱ्यांना दोन्ही वेळी थम्ब इम्प्रेशन बंधनकारक करण्याचे आदेशही देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)पाच मुद्यांवरच रंगली चर्चाआखाडा बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गतच्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा सदस्यांचा आरोप आहे. मागील अनेक सभांमध्ये हा मुद्दा गाजला. मात्र त्यावर अंतिम कार्यवाही अजूनही नाही. आजच्या सभेतही पुन्हा एक महिन्याची मुदत दिली. यात कामे पूर्ण झाली नाही तर फौजदारीसह कारवाईचे इतर पर्याय वापरण्यात येणार आहेत.