शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मयत लाभार्थ्यांच्या नावावरील धान्य परस्पर केले वितरित

By admin | Updated: September 30, 2015 13:31 IST

स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेखे तपासणीला उपलब्ध करून न देणे, मयत लाभार्थ्यांच्या नातेवाईकास परस्पर स्वत:च्या अधिकारात धान्य वितरण करणे

लातूर : स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेखे तपासणीला उपलब्ध करून न देणे, मयत लाभार्थ्यांच्या नातेवाईकास परस्पर स्वत:च्या अधिकारात धान्य वितरण करणे, शिवाय धान्य जादा दराने विक्री केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील पाच स्वस्त धान्य दुकानांवर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी कारवाई केली असून, दोन दुकानांचा परवाना निलंबित केला असून, दोघांवर दंडात्मक तर एका दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. 
निलंगा तालुक्यातील होसूर येथील मल्हारी मारोती कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानातील अभिलेखे चौकशीसाठी उपलब्ध करून दिले नाहीत. तसेच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य दिले नाही. तसेच गाव सोडून गेलेल्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांस परस्पर धान्य वितरण केल्याचे चौकशीत निदर्शनास आले. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी याबाबत सुनावणी घेऊन त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे. रेणापूर तालुक्यातील लहू विश्‍वनाथ कातळे यांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, धान्य जादा दराने विक्री, धान्याचा ताळमेळ नसणे, परिमाणानुसार धान्य वितरण न करणे आदी कारणांवरून परवाना निलंबित केला आहे. जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे राजाराम हणमंत चट यांच्या दुकानाचाही परवानाही निलंबित करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील मोळवणवाडी येथील वसंत व्यंकटराव चाटे यांच्या स्वस्त धान्य दुकानात अन्नसुरक्षा एपीएल, बीपीएल, अन्त्योदय योजनेच्या याद्यांमध्ये लाभार्थ्यांच्या नावात तफावत आढळली आहे. त्यामुळे या दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्व दुकानांसमोर लाभार्थ्यांच्या याद्या लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.