शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपालिकांना २३ कोटी वितरित

By admin | Updated: October 15, 2016 01:17 IST

परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील सात नगरपालिका

परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील सात नगरपालिका व एका नगरपंचायतीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण २३ कोटी १३ लाख ८८ हजार ५५२ रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील नगरपालिकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली असून यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने यावेळेसच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी खटाटोप केला जात आहे. त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश आहे. नगरपालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी राज्यशासनाने मात्र जिल्ह्यातील नगरपालिकांना निधी देताना समानतेचे धोरण ठेवल्याचेच दिसून येत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात शासनाने जिल्ह्यातील ७ नगरपालिका व एका नगरपंचायतीला एकूण २३ कोटी २ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाखेड नगरपालिकेला २५ लाख रुपये, सेलू नगरपालिकेला १ कोटी १० लाख रुपये, जिंतूर पालिकेला २५ लाख रुपये, मानवतला ७५ लाख रुपये, सोनपेठ नगरपालिकेला १ कोटी ५० लाख रुपये, पूर्णा नगरपालिकेला २ कोटी ७२ लाख रुपये तर पालम नगरपंचायतीला १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जिंतूर व सेलू वगळता गंगाखेडला १२ लाख ८२ हजार ६५५ रुपये, मानवतला १३ लाख ५६ हजार २२० रुपये, पाथरीला १२ लाख ७२ हजार रुपये, सोनपेठला १४ लाख २३ हजार ९५५ रुपये, पूर्णा पालिकेला १३ लाख ३७ हजार ७०० रुपये आणि पालमला १५ लाख १६ हजार २२ रुपये वितरित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चार नगरपालिकांना शासनाने विशेष रस्ता अनुदान दिले आहे. त्यामध्ये गंगाखेड, सेलू, पाथरी व सोनपेठ या चार पालिकांना प्रत्येकी २ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच वैैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन पालिकांना निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये मानवत नगरपालिकेला ३ कोटी रुपये, गंगाखेड नगरपालिकेला २ कोटी रुपये तर सोनपेठ पालिकेला १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.