शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी वाद मिटला अन् पहाटे पेटविले

By admin | Updated: April 23, 2015 00:50 IST

मधुकर सिरसट ,केज जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले.

मधुकर सिरसट ,केजजिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. वर्षा दिना मुळे (रा. उमरी) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी २०० रुपये महिन्याने भारत वामन मुळे याच्याकडून बोअरचे पाणी घेतले होते. मात्र त्यांच्यात पाणी भरण्यावरून गुरुवारी वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर केज ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीही दाखल झाल्या. त्यानंतर वाद धुमसतच गेला. रविवारी पहाटे भारत वामन मुळे , धनराज वामन मुळे, मनीषा संपत मुळे हे तिघे वर्षा यांच्या घरावर चालून गेले. त्यांना घराबाहेर बोलावून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. जिवाच्या आकांताने वर्षा सैरावैरा धावत सुटल्या. मात्र आग विझेपर्यंत त्या ९५ टक्के भाजल्या. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.पीठ गिरणी चालवून उदरनिर्वाहवर्षा मुळे याचे पती दिना यांचा आठ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. वर्षा यांना दोन मुले असून गावात पीठ गिरणी चालवून त्या उदरनिर्वाह करत आहेत. तीनही आरोपी जेरबंदया प्रकरणातील आरोपी भारत मुळे, धनराज मुळे, मनीषा मुळे यांना केज पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील मनीषा हिचा गावात हॉटेलचा व्यवसाय आहे.वर्षा मुळे यांनी वर्षभरापूर्वी भारत मुळे याला ४० हजार रुपये हातउसणे दिले होते. वर्षा यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे परत करण्याची अट घातली होती. मात्र लग्नावेळी भारत याने पैसे परत केले नाहीत. दरम्यानच्या काळात वर्षा यांना मनीषा मुळे हिच्या मध्यस्थीने २०० रुपये महिन्याने भारत याने बोअरवरून पाणी देणे सुरू केले होते. नंतर त्याने पाणी देणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला. वर्षा मुळे व भारत मुळे यांचा वाद ठाण्यापर्यंत पोहंचल्यानंतर फिर्यादी दाखल झाल्या. मात्र त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेतला. शनिवारी दुपारी तंटामुक्ती अध्यक्ष भागवत यादव, उपसरपंच बालासाहेब यादव, दत्ता चाळक यांच्या मध्यस्थीने तडजोड झाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे वर्षा यांना पेटविले.