शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत सचिवांचाच खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:20 IST

जिल्ह्यात पुन्हा तूर खरेदी करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत होती. मात्र ती संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असले तरीही बाजार समिती मात्र अजून जागची हलायला तयार नाही. महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांची तूर तर जात नाही याची चाचपणी करण्यास प्रत्यक्ष शेतकºयांच्या घरी पाहणी करून दिलेल्या याद्यांवर काहीच केले नाही. उलट नव्या ७५ शेतकºयांची यादी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पुन्हा तूर खरेदी करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत होती. मात्र ती संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असले तरीही बाजार समिती मात्र अजून जागची हलायला तयार नाही. महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांची तूर तर जात नाही याची चाचपणी करण्यास प्रत्यक्ष शेतकºयांच्या घरी पाहणी करून दिलेल्या याद्यांवर काहीच केले नाही. उलट नव्या ७५ शेतकºयांची यादी दिली.हिंगोली बाजार समितीत सुरवातीपासूनच तूर खरेदीचा गोंधळ उडाला होता. शेतकºयांना डावलून व्यापाºयांचाच माल नाफेडच्या केंद्रावर खरेदी केला जात असल्याच्या उघड तक्रारीही झाल्या. मात्र आम्ही फक्त सुविधा पुरविणारे असल्याचे सांगून बाजार समिती हात झटकत राहिली. तर नाफेडच्या अधिकाºयांनी नियमांचा बाऊ करीत हात धुवून घेतले. यात शेतकºयांची तूर तशीच पडून राहिली. नंतर सरकारने मुदतवाढीचे फंडे आणले अन् नाफेडने खरेदी केेंद्र बंद ठेवले. पुन्हा बारदान्याचा प्रश्न समोर आला. शेवटच्या टप्प्यात नोंदणी केलेल्या नव्हे, टोकन दिलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी करण्याचा आदेश आला. यात चार हजार शेतकºयांची ५४ हजार क्विंटल तूर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तिला मंजुरी मिळेपर्यंत खुल्या बाजारातच तुरीचे दर पाच हजारांवर गेले. अनेकांनी यातच तूर विकली. नंतर केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीने टाळाटाळ चालविली असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. जिल्हाधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी तूरसाठा तपासणीचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार हिंगोली उपविभागात हिंगोलीत ११३ शेतकºयांकडे १५८१ क्विंटल तर सेनगाव तालुक्यातील ७६ शेतकºयांकडे ७0७ क्विंटल तुरीचा साठा असल्याचे प्रत्यक्ष तपासणीत आढळले होते. सुटीच्या दिवसांतही हे काम केला. तर कळमनुरी उपविभागातील १0 शेतकºयांकडे तूर आहे.अशा २२२ शेतकºयांची यादीही प्रशासनाने २८ आॅगस्टला बाजार समितीस नेण्यास कळविले. मात्र ती न नेता आणखी ७५ शेतकºयांची यादी त्यांनी प्रशासनाकडे पाठविली. त्यामुळे त्यांची तपासणी कधी करायची? हा प्रश्न आहे. ती न झाल्यास या शेतकºयांकडे तूर असल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्याला पूर्णपणे जब्बार पटेल हेच जबाबदार राहतील, असे पत्रात म्हटले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.