शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहर विकासावर चर्चा

By admin | Updated: May 21, 2014 00:49 IST

परभणी: शहराच्या विकास कामाबाबत मनपाचे महापौर प्रताप देशमुख यांनी निधीबाबत ५ मे रोजी पत्रक पाठविले होते़

 परभणी: शहराच्या विकास कामाबाबत मनपाचे महापौर प्रताप देशमुख यांनी निधीबाबत ५ मे रोजी पत्रक पाठविले होते़ यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० मे रोजी मंत्र्यालयामध्ये विविध विभागाच्या अधिकार्‍यासोबत बैठक घेतली़ अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते़ याप्रसंगी राज्यमंत्री उदय सामंत, आ़ नवाब मलिक, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, सुधीर श्रीवास्तव, श्रीकांत सिंह, आऱ डी़ शिंदे, भापकर, गिरीश उमप, जी़ ए़ लोखंडे, दी़ वा़ दळवी, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, अधीक्षक अभियंता गणेशकर, नगरसेवक हफीज चाऊस, मनपा आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, शहर अभियंता रमेश वाघमारे आदी उपस्थित होते़ या बैठकीत परभणी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजनेमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे़ दुसर्‍या टप्प्यामध्ये जागे अभावी रखडली आहे़ त्याबाबत महापौर प्रताप देशमुख यांनी जालना येथील पाणीपुरवठा योजनेस शासनाने ज्या प्रकार मदत केली त्याच धर्तीवर परभणी मनपाला सुद्धा मदत करावी, अशी सूचना केली़ याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योग विभाग व कृषी विभाग यांना मनपाला आवश्यक जागा देण्याबाबत सूचना देऊन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत करण्याबाबत महापौर प्रताप देशमुख यांना आश्वासन दिले़ तसेच कर्मचार्‍यांच्या पगारापोटी मिळणार्‍या सहाय्यक अनुदान फरकाची रक्कम ४ कोटी बर्‍याच वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे़ त्याबाबत संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनाय यांना त्वरीत आदा करण्याबाबत आदेशीत केले़ उपमहापौर सज्जू लाला यांनी अल्पसंख्याक क्षेत्र विकासकामासाठी निधी मिळावा अशी सूचना केली़ तसेच अलिगढ येथे जशी मुस्लिम विद्यापीठ आहे त्या धर्तीवर मरावाड्यात एक विद्यापीठ स्थापन होणार आहे़ विद्यापीठ परभणी येथे स्थापन करण्याची मागणी केली़ तसेच परभणी शहरात विद्युत तार आहेत़ त्या तार भूमीगत करण्याबाबत प्रस्ताव पाठविल्यास त्यास मंजुरी देण्याबाबत आश्वासन दिले़ मनपा कर्मचार्‍यांना मंजूर आकृतीबंध आराखड्यानुसार अधिकारी वर्ग उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा झाली तसेच कृषी विद्यापीठाची ५ एकर जागा वॉटर ट्रिटमेंट प्लॅट आदीं कामासाठी १० कोटींचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या बैठकीत आश्वासन देण्यात आले़