ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेचा अर्ज नामंजूर

By Admin | Updated: January 18, 2015 00:30 IST2015-01-18T00:18:33+5:302015-01-18T00:30:03+5:30

लातूर : तालुक्यातील पाखरसांगवी येथील सरपंचासह दोन सदस्य व ग्रामसेवकास अपात्र ठरविण्यात यावे यासंदर्भात दाखल झालेला अर्ज अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे़

Disapproved application for disqualification of office bearers | ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेचा अर्ज नामंजूर

ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेचा अर्ज नामंजूर


लातूर : तालुक्यातील पाखरसांगवी येथील सरपंचासह दोन सदस्य व ग्रामसेवकास अपात्र ठरविण्यात यावे यासंदर्भात दाखल झालेला अर्ज अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे़ त्यामुळे या तीन पदाधिकाऱ्यांचे आणि एका शासकीय कर्मचाऱ्यास पुन्हा कार्यरत राहण्याची मुभा मिळाली आहे़
लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथे सरपंच महानंदा बोयणे, ग्रामपंचायत सदस्य अन्वरबी पठाण, संतोष सूर्यवंशी यांच्यासह विद्यमान ग्रामसेवकास मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविण्यात यावे़ यासदंर्भात गावातील सिद्धार्थ ढगे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता़ या चौघांनी ग्रामसभा तसेच मासिक सभा घेतली नाही़ तसेच एक वर्षाच्या कालावधीत संगणमतांनी लाखे रूपयांचा अपहार केला़ महानंदा बोयणे यांनी स्वत: च्या नावावर गुत्तेदार म्हणून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ लाखाचे काम करून पतीच्या नावाने धनादेश उचलले़ तसेच बोयणे यांनी चार महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही, असा आरोप ढगे यांनी आपल्या तक्रार अर्जात केला होता़
या तक्रार अर्जावर अपर जिल्हाधिकारी डॉ़ पुरुषोत्तम पाटोदकर यांच्यासमोर सुनावणी झाली़ यावेळी दोन्ही बाजुने युक्तीवाद करण्यात आला़ यावर डॉ़ पाटोदकर यांनी ढगे यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Disapproved application for disqualification of office bearers