इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:24 IST2021-12-23T16:20:27+5:302021-12-23T16:24:15+5:30
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल १६३० मतांची आघाडी घेऊन या प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्चस्व कायम ठेवले.

इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
सिल्लोड : सिल्लोड न.प.च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांचा १६३० मतांनी विजय झाला. तर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेच्या उमेदवार फातमाबी यांना २०१९ मते मिळाली. वंचित आघाडीचा उमेदवार ३८९ मते घेऊन दोन नंबरला होता, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेस व राष्ट्रवादीला सन्मानजनक आकडासुद्धा पार करता आला नाही.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल १६३० मतांची आघाडी घेऊन या प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. पैकी ५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेचा सिल्लोडमध्ये हा ऐतिहासिक विजय झाला. भाजपसह इतर पक्षाच्या उमेदवारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी उमेदवाराची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, आमेर शेख, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, रउफ बागवान, मनोज झंवर, शेख मोहसीन, विठ्ठल सपकाळ, मतीन देशमुख, अकिल देशमुख, शंकरराव खांडवे, अमृत पटेल, रईस मुजावर, जुम्माखा पठाण, सुधाकर पाटील, शेख बाबर आदी उपस्थित होते.
दोन नंबरवर वंचित बहुजन आघाडी
शिवोनेच्या पठाण फातमाबी जब्बार खान २०१९, वंचितच्या पठाण कैसरबी बनेखा ३८९, भाजपच्या मिसाळ छायाबाई मोतीराम २१०, शेख आसमा मुख्तार ७९, काँग्रेसच्या शेख जकीया अकबर ५३, राष्ट्रवादीच्या शेख फरिदा बेगम २६, पठाण रईसाबी चांदखा ९ तर नोटाला १४ मते पडली. या निवडणुकीत एकूण २७९९ मतदान झाले असून त्यापैकी शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल २०१९ तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ३८९ मतदान घेऊन दोन क्रमांकावर राहिला.