शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रेच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी साधला मतदारांशी संवाद

By admin | Updated: October 2, 2014 01:22 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. बुधवारी बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी, आझाद चौक भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी या भागातील प्रत्येक घरी जाऊन मतदानाचे आवाहन केले. राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेची सुरुवात हाजी फंक्शन हॉल येथून करण्यात आली. आजच्या पदयात्रेत आ. एम. एम. शेख व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेंद्र दर्डा व एम. एम. शेख यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पदयात्रा ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने पुढे जात होती. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा पुढे वाहेद कॉलनी, टाकळकर सोसायटीमार्गे बारी कॉलनीत पोहोचली. त्यानंतर अल्तमश कॉलनीत राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील नागरिकांकडून सत्कार स्वीकारले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. पदयात्रा हशमत रहीम चौकात पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी दुकानदारांशी भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन केले. परिसरातील विविध काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या वतीने राजेंद्र दर्डा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. मौलाना आझाद चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी परिसरातील नगरसेवक , काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यानगर, न्यायनगरात आज पदयात्राराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. ७० विद्यानगर, ७१ न्यायनगर भागात काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता अण्णांची टपरी विद्यानगर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.