शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

धारूर सा.बां. विभागाचा कारभार राम भरोसे

By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. येथे कार्यरत असलेले उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे उंटावरुनच कारभार हाकत असल्याने महिनाभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते उखडू लागले आहेत. केवळ महिनाभरातच हे रस्ते उखडल्याने या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.धारुर सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंते दोन आहेत, मात्र हे सर्व लातूरहूनच धारुर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार हाकतात. उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे तब्बल महिना-महिना सा.बां. विभागाच्या कार्यालयाकडे फिरकत नसल्याने होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असून, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वरिष्ठांचेच अभय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केला आहे. पांगरी ते वाघोली हे ४ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या रस्त्यावर हॉटमिक्स कारपेट करण्याचे टाळून सरफेज ड्रेसिंग करुन काम आटोपते घेण्यात आले. त्यामुळे महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. तीच अवस्था धारुर, आसरडोह रस्त्याची झाली असून, या रस्त्याचे काम होऊन यावर आत्ताच खड्डे झाल्याने पावसाळ्यात याची काय अवस्था होणार? असा प्रश्न भाजपाचे बाळासाहेब कुरुंद यांनी उपस्थित केला आहे. या सर्व कामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व कारभाराकडे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही कुरुंद यांनी केला आहे. या कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढासळत चालला असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? कामाचा दर्जा सुधारणार की नाही? यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत.याबाबत उपविभागाचे उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे दोन्ही अभियंते मागील अनेक दिवसांपासून कार्यालयाकडे फिरकले नसल्याने सर्वसामान्यांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत. हे अभियंते लातूरला वास्तव्यास असल्याने धारुरच्या सा.बां. विभागाचा संपूर्ण कारभार हा लातूरहूनच हाकला जात असल्याचा आरोपही कुरुंद व सावंत यांनी केला आहे.सा.बां. विभागाच्या गलथान कारभारामुळे धारुर तालुक्यातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. महिनाभरातच रस्ते उखडत असल्याने रस्त्यासाठी आलेला निधी हडप करण्याचे काम अभियंत्यासह इतर अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या दोन्ही अभियंत्यांनी धारुर कार्यालयात थांबून व्यवस्थित काम करुन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.(वार्ताहर)नियंत्रणाचा अभावअभियंते कार्यालयात हजर राहत नसल्याने रस्त्याचे कामे होत आहेत निकृष्ट दर्जाचेमहिनाभरातच उखडले रस्तेअभियंत्यांच्या कामकाजावर सर्वसामान्यांमधून होतोय प्रश्न उपस्थितवरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा बंडोबा सावंत, बाळासाहेब कुरुंद यांचा आरोप