शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धनदांडगेच बिल बुडवे !

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

राजेश खराडे , बीड भारनियमन, वीजपुरवठ्यावर बोटे मोडणारेच महावितरणची बिले बुडविण्यात पुढे आहेत. महावितरणने टॉप हंड्रेड थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

राजेश खराडे , बीडभारनियमन, वीजपुरवठ्यावर बोटे मोडणारेच महावितरणची बिले बुडविण्यात पुढे आहेत. महावितरणने टॉप हंड्रेड थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. त्यावर नजर टाकली तर त्यात बहुतांश जण धनदांडगे व शासकीय कार्यालयांचाच समावेश आहे. ‘दिव्याखालीच अंधार’ अशी स्थिती असेल तर सामान्यांच्या मागेच तगादा का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.महावितरण कंपनीला सर्वाधिक फटका हा शेतीपंप ग्राहकांकडून बसत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, नगरपालिका, शासकीय व निम्मशासकीय अशा सर्वाधिक थकबाकी असलेल्या सुरवातीच्या १०० ग्राहकांकडे बीड व अंबाजोगाई विभागातील तब्बल ११ कोटी ३४ लाख एवढी थकबाकी आहे. थकबाकीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. व्यापारी ग्राहकाकडे सर्वाधिक १४ लाख २७ हजार थकबाकी आहे. टॉप हंड्रेडमध्ये औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक असून त्यापाठोपाठ व्यापारी आणि घरगुती ग्राहकांचा क्रमांक लागतो.औद्योगिक ग्राहक मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करतात मात्र नियमितपणे बिले अदा करीत नसल्याचे दिसून येत आहे. बीड शहरातच व्यापारी, उद्योजक, शासकीय कार्यालये अधिक प्रमाणात आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, पोलिस अधीक्षक कार्यालये यांचाही समावेश ेटॉप हंड्रेडमध्येच आहे. त्यामुळे केवळ शेतीपंपग्राहक, घरगुती ग्राहक यांच्याकडूनच नाही तर शासकीय कार्यालयांचाही भुर्दंड महावितरणला सहन करवा लागत आहे. दुसरीकडे मात्र दुष्काळातही महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा तगादा सुरू आहे.