शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

फुले मार्केटच्या उभारणीला मुहूर्त लागला

By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST

संजय कुलकर्णी , जालना शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामास अखेर मुहूर्त लागला असून यासंबंधीची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संजय कुलकर्णी , जालना शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामास अखेर मुहूर्त लागला असून यासंबंधीची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३८ दिवसानंतर या कामासाठी एजन्सी निश्चित होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. जानेवारी २०१५ मध्ये नगरविकास खात्याकडून बीओटी तत्वावर या इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. नगरपालिकेच्या मालकीची ही इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे २००५-०६ मध्ये पाडण्यात आली होती. सुरूवातीला व्यापाऱ्यांचा विरोध, त्यानंतर त्यांची संमती, व्यापाऱ्यांचे इतरत्र स्थलांतर या बाबींमध्ये काहीवेळ गेला. त्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांपासून इमारतीच्या बांधकामास तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयात यासंबंधीची संचिका दीर्घकाळ प्रलंबित होती. फुले मार्केटची नवीन इमारत केव्हा होणार, याविषयीची शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणताही निर्णय होत नसल्याने या इमारतीच्या बांधकामला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर आता ई-निविदा प्रसिद्ध झाल्याने आगामी दीड महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात कामास सुरूवात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या कामामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान म्हणाले, हे काम मार्गी लागावे, यासाठी गेल्या एक वर्षापासून नगरपालिका सतत प्रयत्नशील होती. आगामी दीड महिन्यांच्या काळात एजन्सी नियुक्त करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला जाणार आहे. हे काम उच्च दर्जाचे व पारदर्शक व्हावे, यासाठी नगरपालिका प्रयत्नशील असल्याचेही प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान यांनी सांगितले. महात्मा फुले मार्केटचा परिसर ६ हजार ५५ स्क्वेअर मीटर असून इमारत बांधकामाचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे. ही इमारत चार मजली राहणार आहे. यात भूमिगत तळमजल्यावर पार्किंग, पहिला व दुसऱ्या मजल्यावरील २८३ गाळे जुन्या मालकांना देण्यात येणार आहेत. याशिवाय २, ३ व ४ था मजला विकासकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ४विकासकाच्या ताब्यात ५ हजार ८३० स्क्वेअर मीटरची जागा असणार आहे. इमारत बांधकामासाठीचे आरक्षित अधिमूल्य ३ कोटी ९७ लाख रुपये एवढे आहे. म्हणजे ज्या एजन्सीला या बांधकामाचे कंत्राट घ्यायचे आहे, त्यांना या रक्कमेपेक्षा अधिक बोली बोलावी लागणार आहे. ४गेल्या आठ वर्षांपासून महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीचे काम रेंगाळले होते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन पातळीवर मोठे प्रयत्न केले. नगरपालिकेच्या माध्यमातूनही त्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता. ४हे काम लवकर मार्गी लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. फुले मार्केट परिसर हा शहराची शान समजला जातो. येथील पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांच्या वेड्यावाकड्या रांगाही दिसणार नाहीत.