शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाचे आदेश आले तरी घेतली लाच; सहदुय्यम निबंधकाच्या घरातून सव्वा कोटींची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:21 IST

एसीबीची मोठी कारवाई! लाचखोर सहदुय्यम निबंधकाच्या घरातून १ कोटी ३५ लाखांची रोकड जप्त

सिल्लोड : भावजयीच्या नावावर असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच तक्रादाराकडून स्वीकारताना येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील (वय ४९ वर्षे) यांच्यासह दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवार, १ मार्च रोजी करण्यात आली. पाटील यांच्यासह स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात (वय ५८ वर्षे) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर एसीबीने पाटीलच्या घराची झडती घेतली असता तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील ३९ वर्षीय तक्रारदार व त्यांची भावजयी यांच्या नावे याच तालुक्यातील धावडा शिवारातील गट क्रमांक ४७/१ मध्ये सामाईक शेती आहे. ही शेती तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने खरात याची भेट घेतली. त्यानंतर खरात याने याबाबतची माहिती पाटील यांना सांगितली. मात्र या कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराला या दोघांनी केली. पाच हजार रुपये देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर या विभागाच्या पथकाने शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवार, १ मार्च रोजी सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना पाटील आणि खरात यांना या पथकाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. 

ही कारवाई या विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उपाधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस हवालदार साईनाथ तोडकर, केवलसिंग गुसिंगे, युवराज हिवाळे, पोलिस अंमलदार बागुल यांनी केली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवशी निलंबन आणि लाचप्रकरणी अटकसदर आरोपी पाटीलने सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान एकूण ४४ तुकडा बंदी संदर्भाने नोंदणी केली होती. सदर प्रकरणात मुद्रांक मूल्यांकन कमी करून शासनाची तब्बल ४८ लाखांचे नुकसान केले शिवाय ८६ दस्तांमध्ये नियमांचा भंग केला. हा घोटाळा समोर आल्यानंतर राज्याच्या उपसचिवांकडून त्यांच्या चौकशीचे आदेश जारी झाले. त्यात पाटील दोषी निष्पन्न झाल्याने त्यांना २९ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले.

निलंबन कारवाईची नव्हती कल्पनापाटील याला आपण निलंबित झाल्याची शुक्रवारी दुपारपर्यंत कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे दालनात काम करत असताना त्याने तक्रारदाराला पाच हजार रूपये घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार कायार्लयात पोहोचले. तोपर्यंत पाटील यांना निलंबनाची वार्ता कळाली होती. मात्र, तरी त्यांनी स्टॅम्पव्हेंडरच्या मदतीने लाच स्वीकारली. जवळच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्हीही लाचखाेरांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद