शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा रोगापेक्षा इलाज भयंकर

By admin | Updated: August 4, 2014 00:47 IST

सेलू : मे महिन्यात ठिबकवर लावलेल्या कापसांच्या झाडाची पाने लाल पडू लागली व कापसाची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़

सेलू : मे महिन्यात ठिबकवर लावलेल्या कापसांच्या झाडाची पाने लाल पडू लागली व कापसाची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़ त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या कापसांच्या झाडावर फवारणीसाठी दिलेल्या औषधीमुळे कापसाचे अधिक नुकसान झाल्याची तक्रार आहेरबोरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे़ सेलू परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनवर मे महिन्यात कापसाची लागवड केली़ परंतु, जून महिन्याच्या शेवटी या कापसाची पाने लाल पडली व वाढही खुंटली़ त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली़ त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिबकवरच्या कापसाची पाहणी केली व कृषी विभागाकडून सवलतीच्या दरात फवारणीसाठी कीटकनाशके दिली़ परंतु, आहेरबोरगाव येथील पांडुरंग लहाने व जिवाजी मोगरे यांनी कापसाच्या झाडावर फवारणी केली असता कापसाचे अधिक नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे़ कृषी विभागाकडून डायमेथोएट हे औषध व अ‍ॅग्रोस्टीन ही बुरशीनाशकाचा एक पुडा संबंधित शेतकऱ्यांना कापूस लाल पडू नये यासाठी दिला़ त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने फ वारणी केली़ परंतु, पांडुरंग लहाने व जिवाजी मोगरे यांच्या शेतातील कापसाचे फवारणीनंतर अधिकच नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ दरम्यान, पांडुरंग लहाने यांनी दोन एकर कापसाच्या क्षेत्रावर कृषी विभागाने दिलेल्या औषधांची फवारणी केली. परंतु, कापसाची पाने अधिकच करपून व गळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)सेलू तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आॅगस्ट महिना उजडला असताना केवळ १२८ मि. मी़ पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे़ त्यामुळे दुृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ ठिबक सिंचनावर लावलेली कापसाच्या झाडांची पाने लाल पडू लागली व वाढ खुंटल्यामुळे पाणी असलेले शेतकरीही चिंतेत आहेत़ तसेच कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाची परिस्थिती जेमतेम आहे़ अत्यल्प पावसामुळे कापसाची व सोयाबीनची पिके धोक्यात सापडली आहेत़ महागडी औषधी फवारणी करुन काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण आहेत. मुळात पाऊसच कमी झाल्यामुळे पिकांची वाढ झालेली नाही़ त्याचबरोबर रोगांचेही प्रमाण वाढले आहे़ दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणाचा व उपद्रवी वन्य प्राण्यांच्या चकरात शेतकरी अडकला आहे़