शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये डेंग्यूचा मुक्काम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:15 IST

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फैलावलेले तापी, डेंग्यूचे आजार ग्रामीण भागात नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फैलावलेले तापी, डेंग्यूचे आजार ग्रामीण भागात नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून, बीडमध्ये मात्र अद्यापही डेंग्यू ‘अनकंट्रोल’ असल्याचे चित्र खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्ण संख्येवरुन दिसून येत आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आठवडाभरापूर्वी न. प. ला ताकिद दिल्यानंतरही डेंग्यूचा मुक्काम लांबतो आहे.नियमित पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने करण्यात येणारे साठे, डबके, कच-यांच्या ढिगा-यांवर होणारी डासांची पैदास यामुळे ताप आणि डेंग्यूच्या रुग्णात भर पडली. जिल्हा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. सर्वेक्षण सुरु केले. जास्त रुग्ण आढळणा-या गावांत उद्रेकस्थिती लक्षात घेत उपाययोजना केल्या. स्वच्छतेसह पाण्याचे साठे नष्ट करण्यात आले. अबेटींग, धुरळणी करण्यात आली. दरम्यान बीड शहरात कच-याची विल्हेवाट लावण्यात नगर पालिका अपयशी ठरली. त्यामुळे अनेक दिवस शहरातील रस्त्यांवर गटारीलगत कचºयांचे ढीग होते. ग्रामीण भागातील ताप, डेंग्यूचे लोण बीडमध्ये पसरले. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. मागील आठवड्यात बैठकीत बीड शहरातील साथरोग स्थितीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. त्यानंतर शहरात स्वच्छतेच्या कामांना वेग आला. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही शहरातील रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या पाहता डेंग्यूचा मुक्काम सुरुच असल्याचे दिसून आले.