शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा ताप, मनपात संताप

By admin | Updated: July 11, 2014 01:05 IST

औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने मनपा आरोग्य विभागावर निष्क्रियतेचे खापर फोडले.

औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने मनपा आरोग्य विभागावर निष्क्रियतेचे खापर फोडले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांचा पदभार काढण्यासाठी घोषणाबाजी करीत महापौर कला ओझा यांच्यासमोर ठिय्या दिला. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. सभागृह नेते किशोर नागरे म्हणाले, पावसाळा लागला असून, डासांची पैदास वाढल्यामुळे तापेचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. मनपा दप्तरी तीन महिन्यांत ४६ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून, एन-८ मध्ये ३८ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. नगरसेविका छाया वेताळ म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील महिला आघाडीच्या शाखाप्रमुखांचे डेंग्यूमुळे निधन झाले आहे. नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या नातेवाईकाच्या मुलाला डेंग्यू झाला आहे. असे असताना औषधी फवारणी, धूरफवारणी कुठे होते, याची काहीही माहिती आरोग्य विभाग देत नसल्याचा आरोप सदस्य राजू वैद्य, समीर राजूरकर, प्रीती तोतला, मुजीब खान यांनी केला. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांना शासनाकडून निधी आणण्याच्या कामासाठी नियुक्त करावे. दरम्यान, डॉ.कुलकर्णी यांच्या विरोधातील प्रस्तावावर ७० नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रभागनिहाय जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीआयुक्त डॉ. कांबळे म्हणाले, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे काम रेंगाळले आहे. प्रभागनिहाय नोंदणीसाठी प्रभाग अधिकाऱ्यांना स्वायत्तता देण्यात येणार आहे. नावात दुरुस्तीदेखील प्रभाग कार्यालयातच होईल. तसेच वॉर्डनिहाय औषधी फवारणी सोमवारपासून सुरू होईल. नगरसेवकांकडे फवारणीची यादी दिली जाईल. आरोग्य अधिकाऱ्याची स्वेच्छा निवृत्तीडॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी होईपर्यंत त्या रजेवर असतील. त्यांच्या नियुक्ती प्रकरणात हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत.चौकशी होईपर्यंत डॉ. संध्या टाकळकर यांच्याकडे आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १० ते १२ दिवसांत चौकशी पूर्ण होईल, असा दावा आयुक्तांनी केला. सभागृहातच डॉ. कुलकर्णी यांनी रजेचा अर्ज आयुक्तांना लिहून देत सभागृह सोडले. दरम्यान, कुलकर्णी यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी तावातावाने अर्ज दिला. या प्रकरणी डॉ. कुलकर्णी यांच्याशी साधला असता व्हीआरएससाठी अर्ज दिल्याचे त्या म्हणाल्या.पुरस्कारानंतर असाही सत्कार११ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुरस्कार समारंभास डॉ. कुलकर्णी जाणार असून, त्यांना स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी शहरात के लेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.