शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीच्या रुग्णाकडे लाचेची मागणी

By admin | Updated: October 12, 2014 00:32 IST

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झालेले असताना घाटीत एका रुग्णाला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झालेले असताना घाटीत एका रुग्णाला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत ही रक्कम दिली जाणार नाही, तोपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही, असा दमच डॉक्टरांनी दिल्याचा आरोप रुग्णाच्या आईने केलाआहे.नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील भय्यासाहेब वाघमारे हा तरुण बिगारी काम करून वृद्ध आईसह उदरनिर्वाह चालवितो. बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करीत असताना इमारतीवरून पडल्याने त्याच्या पाठीच्या मणक्याला जबर मार लागला. त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घाटीत जाण्याचा सल्ला दिला. भय्यासाहेबला घेऊन त्याची आई घाटीत आली.आॅर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी त्यास १ सप्टेंबर रोजी वॉर्ड क्रमांक १३ मध्ये अ‍ॅडमिट केले. डॉक्टरांनी त्याची एक्स-रे तपासणी केली तेव्हा त्याच्या पाठीच्या मणक्याचे १२ नंबरचे हाड मोडले असल्याचे निदान करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेला पंधरा दिवस उलटल्यानंतर डिस्चार्ज देण्याची विनंती त्यांनी डॉक्टरांक डे केली तेव्हा दहा हजार रुपये दिल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. आम्ही गरीब असून एवढी रक्कम माझ्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांच्याकडे तक्रार केली. डॉ. मगरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अद्याप डिस्चार्ज मिळाला नसल्याचे रुग्णाच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला. निवासी डॉक्टरांनी रुग्णाच्या आईला बोलावून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगून रॉड टाकण्यात आला, त्याचे दहा हजार रुपये मागितले. नंतर रोज त्यांच्याकडे दहा हजार रुपये डॉक्टर मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चौकशी करतो - अविनाश मगरेआॅर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी पैशाची मागणी केल्याची तोंडी तक्रार रुग्णाच्या आईने माझ्याकडे केली आहे. याबाबत चौकशी करीत आहे. तसेच अशा प्रकारे पैशाची मागणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई प्रस्तावित केली जाईल. शिवाय त्या रुग्णावर उपचार सुरू आहेत, असे डॉ. मगरे म्हणाले.