औरंगाबाद : महापालिकेने आज लक्ष्मण चावडी ते एमजीएम या २४ मीटर रस्त्यातील मालमत्तांवर मार्किंग करून पाडापाडी केली. दादा कॉलनी, कैलासनगर भागातील २१ मालमत्तांवर मार्किंग आज सकाळी करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी स्वत:हून मालमत्ता पाडण्यास सुरु वात केली. पुनर्वसनाच्या मागणीसाठी नागरिकांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्रभारी सहा. संचालक नगररचना शिरीष रामटेके यांना घेराव घातला. श्रीमंतांच्या मालमत्तांना अभय देऊन गरिबांच्या मालमत्ता पाडल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला. १ जेसीबी व ३ ट्रक्स, पोलीस पथक , जवान मोहिमेत सहभागी झाले होते. अडीच वर्षांपासून पाडापाडी १६ जानेवारी २०१२ रोजी शहरात विकास आराखड्यातील रस्ते रुंद करण्याची मोहीम तत्कालीन आयुक्त डॉ.पुुरुषोत्तम भापकर यांनी हाती घेतली. ३० पैकी १५ रस्ते रुंद करण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली. अडीच वर्षांपासून त्या रस्त्यातील मालमत्ता पाडण्याची मोहीम सुरू आहे. ७० मालमत्ता होत्या, तसेच काही धार्मिकस्थळेदेखील होती. गेल्या महिन्यांत धार्मिक स्थळे काढण्यात आली. जालना रोडलापर्यायी रस्तालक्ष्मण चावडी ते एमजीएम हा जालना रोडला पर्यायी रस्ता म्हणून पुढे येणार आहे. मोंढानाका, सिडको टी पॉइंट, बाबा पेट्रोलपंप येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यावर जालना रोडवर वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. त्यामुळे एमजीएम रस्त्याचे काम तातडीने करण्याची मनपाची योजना आहे.
कैलासनगरमध्ये हटविली अतिक्रमणे
By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST
औरंगाबाद : महापालिकेने आज लक्ष्मण चावडी ते एमजीएम या २४ मीटर रस्त्यातील मालमत्तांवर मार्किंग करून पाडापाडी केली. दादा कॉलनी, कैलासनगर भागातील २१ मालमत्तांवर मार्किंग आज सकाळी करण्यात आले.
कैलासनगरमध्ये हटविली अतिक्रमणे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}