शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज बुडव्यांची नावे जाहीर करा

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

औरंगाबाद : परतफेडीची क्षमता असतानाही हेतूत: कर्ज बुडविणाऱ्या विजय मल्ल्या यांच्यासारख्यांना बँका राजकीय दबाव अथवा लाचखोरीमुळे कर्ज देत असतात.

औरंगाबाद : परतफेडीची क्षमता असतानाही हेतूत: कर्ज बुडविणाऱ्या विजय मल्ल्या यांच्यासारख्यांना बँका राजकीय दबाव अथवा लाचखोरीमुळे कर्ज देत असतात. अशा बुडव्यांना कर्ज देणाऱ्या बँकांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अशा बँकांचे ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह फॉरेन्सिक आॅडिट’ करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी रविवारी येथे केली. पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडविणाऱ्यांची नावे रिझर्व्ह बँकेने जाहीर करायलाच हवीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.बँक कर्मचारी प्रबोधिनीतर्फे संत एकनाथ रंगमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज बुडव्यांकडून लूट’ या विषयावर अ‍ॅड. प्रशांत भूषण यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी अध्यक्षस्थान भूषविले. स्टेट बँक आॅफ हैदराबाद कर्मचारी युनियनचे बी. एस. सावंत, देवीदास तुळजापूरकर, जगदीश भावठाणकर, धनंजय कुलकर्णी, जसप्रीतसिंग तुटेजा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.परतफेडीची क्षमता असूनही हेतूत: कर्ज बुडविणाऱ्यांवर मेहरनजर दाखविण्याचे काम बँका करीत असतात. दिल्ली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांना अशाच प्रकारे हजारो कोटींचे कर्ज देण्यात आले. अडाणी यांना कर्ज देण्यासाठी स्वत: पंतप्रधानांनी स्टेट बँक आॅफ इंडियावर दबाव आणला होता. सामान्यांना कर्ज देताना तपासणीची चाळणी लावणाऱ्या बँका उद्योगपतींची कागदपत्रेही तपासत नाहीत, अशी खंत अ‍ॅड. भूषण यांनी व्यक्त केली. उद्योगपतींनी बुडविलेली कर्जे ‘वन टाईम सेटलमेंट’, ‘राईटआॅफ’, स्ट्रेस असेट’ आदी प्रकारात टाकून ‘एनपीए’ची आकडेवारी कमी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.‘सीबीआय’, केंद्रीय दक्षता आयोग, माहिती आयोग, लोकपाल, आदी यंत्रणा कमकुवत करण्याचे प्रयत्न केंद्राकडून होत असल्याचेही भूषण यांनी सांगितले. कर्ज बुडव्यांविरुद्ध आता जनता आणि बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.