शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३४५ वस्तीशाळा शिक्षकांचा १० डिसेंबरला फैसला

By admin | Updated: December 7, 2015 01:00 IST

बीड : जिल्ह्यातील ३४५ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओंनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १० डिसेंबर रोजी या सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

बीड : जिल्ह्यातील ३४५ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओंनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १० डिसेंबर रोजी या सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा फैसला होणार आहे.२३ मार्च २०१५ रोजी शालेय शिक्षण विभागाने वस्तीशाळा शिक्षकांचे आदेश रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला वस्तीशाळा शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानुसार खंडपीठाने वस्तीशाळा शिक्षकांचा निर्णय जिल्हा परिषदेने आपल्या स्तरावर घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुषंगाने सीईओ नामदेव ननावरे यांनी यापूर्वी बंद वस्तीशाळेवरील शिक्षकांना अंतिम नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेतली होती. पाठोपाठ नियमित ३४५ वस्तीशाळा शिक्षकांनाही शनिवारी नोटीस काढली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कायम प्राथमिक शिक्षकांचे वेतन मान्य पदांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असल्याने एक वर्षांपासून झालेले नाही. कायम सेवेतील शिक्षकांचे वेतन होण्याच्या अनुषंगाने आपली नियुक्ती रद्द करून जागा रिक्त करणे व रिक्त जागेवर दीर्घकाळ कार्यरत शिक्षकांची नियुक्ती करून त्यांचे वेतन सुरू करणे आवश्यक असल्याचे नोटिशीत नमूद आहे. बिंदू नामावलीही तपासली नव्हती. त्यामुळे आपली नियुक्ती रद्द का करण्यात येऊ नये ? असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, १० डिसेंबर रोजी सीईओ नामदेव ननावरे यांच्या दालनात ३४५ शिक्षकांची वैयक्तिक सुनावणी होणार आहे. यावेळी लेखी खुलासाही सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या बाबतीत निर्णय होईल.जि. प. मध्ये प्राथमिक शिक्षकांची ८ हजार ७६४ पदे मंजूर आहेत. वस्तीशाळा शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी ३१ जुलै २००९ व २७ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे निकष आहेत. निकष पूर्ण न करणाऱ्यांना नियुक्त्या देण्यात येणार नाहीत.याशिवाय ज्या शाळेतील शिक्षकांचे पद मंजूर नाही किंवा ज्या शिक्षकांना पायाभूत पदांमध्ये नियुक्ती नाही अशांचे वेतन अदा केले जाणार नाही. (प्रतिनिधी)