तलावात पोहण्यासाठी गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:27 IST2019-11-13T15:21:54+5:302019-11-13T15:27:24+5:30
पैठण तालुक्यातील थेरगाव येथील घटना.

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू
पैठण : तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील थेरगाव येथे आज बारा वाजता उडकीस आली. सोमनाथ बप्पासाहेब गोलांडे वय १६) सोपान रमेश गोलांडे अशी मृतांची नावे असून दोघे चुलत भाऊ होते.
दोन्हीही मुले गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात जलसाठा कमी होता. तलावात गाळ जमा झाल्याने पोहत असताना अचानक दोघेही गाळात फसले. त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दोघेही आत बुडत गेले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी तलावाकडे धाव घेत मुलांना बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत दोघांना पाचोड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी रोहीत जैन यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.