औरंगाबाद : अधिक मासाचा महिना असल्याने सासुरवाडीला धोंडा खाण्यासाठी जाताना बाप- लेकीच्या जिवावरच धोंडा पडल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद- फुलंब्री महामार्गाजवळील आडनदी भागात शुक्रवारी घडली.
टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात गोकुळ अहिलाजी बखले ३२, हर्सूल व प्रांजल गोकुळ बखळे या चारवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. अन्य दोघे जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोकुळ बखळे हे दुचाकीने एम. एम.- २०, डी. जी. ७७६७ सहकुटुंब फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथे दुपारी धोंड्यासाठी जात होते. फुलंब्री परिसरातील पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात गोकूळ यांचा जागीच मृत्यू झाला. भाग्यश्री गोकुळ बखळे २५, पवन बखळे २ आणि प्रांजल हे तिघे जखमी झाले होते. यातील प्रांजलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर आहेत.