शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनांचा दिवस

By admin | Updated: September 2, 2016 22:22 IST

देशव्यापी संप : रास्ता रोको; मोर्चा तर शिक्षकांचा ठिय्या

सिन्नर : केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणामुळे केंद्रीय व राज्य कर्मचारी महासंघ, कामगार संघटना कृती समिती, शिक्षक संघटना व विडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारुन आंदोलने केली. कामगार, शिक्षक, केेंद्र व राज्य कर्मचारी यांनी केलेल्या आंदोलनामुळे शुक्रवारचा दिवस ‘आंदोलनाचा दिवस’ ठरला.
शिक्षक संघटनेने तहसील कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. कामगार संघटना कृती समितीच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले तर सिन्नर तालुका विडी कामगार संघाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. या तीन आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासून गर्दी दिसून येत होती.
रास्ता रोको व निवेदन
सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार, कर्मचाऱ्यांंनी शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारकाजवळून मोर्चा काढला. मोर्चात शासनविरोधी घोषणा देण्यात येत होत्या. नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात कारखाना कामगारांसह राज्य कर्मचारी संघटनेचे सभासद सहभागी झाली होते.
कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जिणे बदल रद्द करा. कामगार कायद्याची कडक अंमल बजावणी करा. खाजगीकरण-कंत्राटीकरण-आऊटसोर्सिंगचे धोरण व निर्णय मागे घ्या. शिक्षणाचा बाजार बंद करुन सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण द्या. केंद्र व राज्य शासनाच्या खात्यांसह जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकेतील ११ लाख रिक्त पदे त्वरित भरा. यंत्रमाग व बिडी कामगारांना शासनाने जाहिर केलेले किमान वेतन लागू करा. बांधकाम कामगारांना विमा, पेन्शन, बोनस आणि शेतमजूर, घरकामगारांसह अन्य असंघटीत कामगारांना नोंदणी करुन कल्याण मंडळामार्फत आरोग्य, विमा, पेन्शन लागू करा. बांधकाम, घरेलू कामगार आदिंच्या कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठण करुन मान्यता द्या. कामगार संघटनांना मंडळावर सदस्यतेच्या आधारावर योग्य प्रतिनीधीत्व द्या. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण व विक्री रद्द करा. रेल्वे, विमा, किरकोळ व्यापार, औषधे, संरक्षण क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचे धोरण मागे घ्या. भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी, पेन्शन योजना यासाठीचा निधी सट्टाबाजारात गुंतविण्याचा निर्णय मागे घ्या. आदिंसह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. मोर्चा वावीवेशीच्या चौफुलीवर आल्यानंतर कामगारांना रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी येवून निवेदन स्विकारले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, रवींद्र गिरी, दत्ता वायचळे, अरुण घोडेराव, विकास जाधव, सुधाकर राऊत, गोविंद शिंदे, भरत गोळेसर, सूर्यभान सांगळे, किशोर सूर्यवंशी, माणिक रानडे, शरद वेलजाळी, विलास जाधव, बी. पी. ठोंबरे, धर्मा होन यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.