शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्ड वर्क’च्या नावाने दांड्या

By admin | Updated: December 3, 2015 00:37 IST

बीड : बीड नगर परीषदेतील अधिकारी, कर्मचारी ‘फिल्ड वर्क’च्या नावाखाली कार्यालयाला दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. येथील बायोमेट्रीक मशीनही

बीड : बीड नगर परीषदेतील अधिकारी, कर्मचारी ‘फिल्ड वर्क’च्या नावाखाली कार्यालयाला दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. येथील बायोमेट्रीक मशीनही या दांडीबहाद्दरांनी बंद पाडल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. अशा दांडीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी ‘रॅटीना इम्प्रेशन’ (डोळ्याचा पडदा) बायोमेट्रीक मशीन बसविण्याची संकल्पना मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी पालीका प्रशासनापुढे व्यक्त केली आहे.येथील नगर पालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे आगोदरच मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकारी, कर्मचाऱ्याकडे दोन विभागाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. त्यामुळे कामाच ताण वाढला आहे. परंतु याचे गांभीर्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना नसून कार्यालयात वेळेवर येण्यास त्यांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कामे घेऊन आलेल्या नागरीकांना या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची वाट पहावी लागते. ‘फिल्ड’वर जाण्याचा बहाणा करून दांडी मारण्याचे प्रमाण वाढले आहे. लिपीकांना कोणत्या फिल्डवर जावे लागते, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. उशीरा कार्यालयात आल्याने बुधवारी वसुली विभागातील अशोक काळे व भारत गायकवाड या दोन निरीक्षकांची गैरहजेरी टाकल्याचे मुख्याधिकारी भालसिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)