शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

अंबड : दामिनी पथकाने सडकसख्याहरींविरोधात उघडलेली मोहीम मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली.

अंबड : दामिनी पथकाने सडकसख्याहरींविरोधात उघडलेली मोहीम मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली. मंगळवारी पथकाने शहरातील विविध विद्यालये, महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. कोणी छेडछाड करीत असल्यास थेट दामिनी पथकास संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी काही विद्यार्थिनींनी छेडछाड होत असल्याच्या तक्रारी पथकाकडे केली. शहरातील बसस्थानकात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दहा सडकसख्याहरींना सोमवारी दामिनी पथकाने बेदम चोप दिला. त्यांना चोप देतानाच त्यांना विद्यार्थिनींच्या पाया पडून पुन्हा अशी चूक करणार नसल्याची शपथ घेण्यास पथकाने भाग पाडले.सोमवारी दिवसभरात बसस्थानक परिसरात कारवाई केल्यानंतर मंगळवारी पथकाने पाचोड रोड ते शासकीय तंत्रनिकेतन, विविध विद्यालय व महाविद्यालयांच्या परिसराची पाहणी केली.सोमवारच्या कारवाईमुळे पथकाची चांगलीच दहशत निर्माण झाल्याने पथक शहरात दाखल झाल्याची कुणकुण लागताच शहरातील सडकसख्याहरी बिळात लपून बसले. पथक प्रमुख कमल गिरी, वंदना मस्के, संजीवनी गाडे, सुरेखा जाधव, सीमा देठे, माधुरी फुके, मेधा नांगलोत, चालक सुरेश पाटील यांच्यासह अंबड पोलीस संदीप कुटे, अलका केंद्रे आदींच्या पथकाने शासकीय तंत्रनिकेतन, ओमशांती अध्यापक महाविद्यालय, ओमशांती विद्यालय व महाविद्यालय, मत्स्योदरी विद्यालय, मत्स्योदरी महाविद्यालय आदी विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विद्यार्थिनीनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मांडाव्यात याकरिता सर्व ठिकाणी पथकाने विद्यार्थिनींशी बंद दाराआड चर्चा केली.यावेळी विद्यार्थिनींनी रोडरोमियो शहरातील कोणकोणत्या ठिकाणी व कशी छेड काढतात याविषयी सविस्तर माहिती पथकातील सदस्यांना दिली. सोमवारच्या कारवाईमुळे आंनदी झालेल्या विद्यार्थिनी, प्राध्यापिका व शिक्षिकांनी ठिकठिकाणी पथकातील सदस्यांचा उत्स्फूर्तपणे सत्कारही केला. (वार्ताहर) भ्रमणध्वनी बोर्डावरपोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई करत असून कुठेही छेडछाडीची घटना होत असेल तर विद्यार्थिंनींनी नि:संकोचपणे आपल्याशी भ्रमणध्वनीव्दारे थेट संपर्क साधावा, असे आवाहन आपण केले आहे. तर सर्व विद्यालये, महाविद्यालयांमध्ये ठिकठिकाणी बोर्डवर आपला भ्रमणध्वनी लिहून दिल्याची माहिती पथकप्रमुख कमल गिरी यांनी दिली. कोणीही संपर्क साधल्यास काही वेळातच मदत देऊ, असेही सांगितले.