शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायालाही उतरती कळा !

By admin | Updated: April 23, 2015 00:49 IST

बीड: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसयाकडे बघितले जाते. दुधाचे दर व पशुधनावर होणारा खर्च पाहता दुध जोडव्यवसयाचेही तीन तेरा वाजले आहेत.

बीड: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसयाकडे बघितले जाते. दुधाचे दर व पशुधनावर होणारा खर्च पाहता दुध जोडव्यवसयाचेही तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे शेतकरी जनावरांना थेट बाजाराचा रस्ता दाखवत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. शेती उत्पादनात घट झाली तर शेतकरी त्याची कसर दुध व्यवसायातून भरून काढत असत. मध्यंतरीच्या काळात शेती पेक्षा दुग्धव्यवसयातून अधिकचे उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसयावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते. त्याकरीता इतर राज्यातून मुरा, सुरती जातीच्या म्हशी तर जर्श्यां गार्इंची मागणी वाढली होती. दुधाचे उत्पन्न वाढल्यामुळे गावातील गल्ली-गल्लीत दुधडेअरी झाल्या होत्या. यामधून बेरोजगारांना रोजगार आणि शेतकऱ्यांनाही दुधव्यवसयातून भरघोस उत्पादन मिळाले. मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेती या मुख्य व्यवसयाबरोबर दुग्ध व्यवसायवरही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. सध्या चाराटंचाई तीव्र जाणवत आहे. त्यामुळे उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. चाऱ्याचे दर हे पिक उत्पादनापेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बिघडले आहे. अनेक अडचनींमुळे दुग्धव्यवसाय सध्या अडचनीत आला आहे. चाऱ्याअभावी दुधाचे उत्पन्नही घटले आहे. घटत्या उत्पादनाचे दर नेहमीच वाढत असतात मात्र प्रशासनाच्या अवकृपेमुळे बळीराज्याच्या बाबतीत उलटे झाले आहे. दुधाचे व पिकाचे उत्पन्न घटूनही दरही घटले आहेत. गतवर्षी गाईच्या दुधाला प्रतिलीटर २५ तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये दर मिळत होता. यंदा मात्र यामध्ये तफावत वाढली आहे. गाईचे दुध १८ रु लिटर तर म्हशीचे २५ रू असे असताना मात्र पेंड, कळना, शेंगदाणा पेंड, गोळी पेंड, सरकी त्याचबरोबर कडब्याचे दर गगणाला भिडले आहेत. चाऱ्याअभावी उत्पादनातही घट दरवर्षी उन्हाळ्यातही दुधाच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून हिरव्या चाऱ्याच्या रुपात कडवळ, मका, घास आदीची लागवड केली जाते. यंदाही मक्याच्या सरासरी क्षेत्राच्या दुप्पटीने लागवड केली आहे. मात्र पाण्याअभावी या चाऱ्याची वाढच खुंटली आहे. तर उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गहन झाल्याने परिणाम दुधउत्पादनावर झाला.(प्रतिनिधी)