शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

अथर्वशीर्षातून संस्कृतीदर्शन

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : सव्वा तासात गणपत्यथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे पठण करून ब्रह्मवृंदांनी शिस्त, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविले. वेदाचार्यांनी चार वेदांचे पठण करून मंगलमय वातावरण निर्माण केले.

औरंगाबाद : सव्वा तासात गणपत्यथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे पठण करून ब्रह्मवृंदांनी शिस्त, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविले. वेदाचार्यांनी चार वेदांचे पठण करून मंगलमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर एका सुरात गणपत्यथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील ४ वर्षांपासून गणेशोत्सवातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपत्यथर्वशीर्षाचे पठण करण्यात येत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे युवकांची संख्या वाखाणण्याजोगी ठरली. सोमवारी सायंकाळी सप्तपदी मंगल कार्यालय ब्रह्मवृंदांनी भरून गेले होते. प्रारंभी गणपतीचे पूजन करण्यात आले. यानंतर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. धर्मपीठावर वेदशास्त्रसंपन्न श्रीराम धानोरकर, अशोक देव, जीवनगुरूभोगावकर यांच्यासह महिला प्रतिनिधी नलिनी वझरकर व जयश्री कुलकर्णी विराजमान झाल्या होत्या. प्रारंभी, चार वेदांचे पठण करण्यात आले. यानंतर शांतीपाठ म्हणून बरोबर ५ वाजता सामूहिक आवर्तन म्हणण्यास सुरुवात झाली. प्रत्येकाच्या हातात गणपत्यथर्वशीर्षाची छापील प्रत देण्यात आली होती. अथर्वशीर्ष हे छोटेसे उपनिषद. सगुण साकार अशा गणेशमूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकारापर्यंत कसे पोहोचायचे ते अथर्वशीर्ष आपल्याला सांगते. उपनिषदातून गणपतीची आराधना करण्याचे माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या गणकऋषींनाही यावेळी वंदन करण्यात आले. प्रारंभी विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यशस्वीतेसाठी रत्नाकर कुलकर्णी, रमेश पाथ्रीकर, प्रकाश वझरकर, कुलदीपक देशपांडे, अरविंद मोदी, अवधूत नाकाडे, अनुराधा पुराणिक, वसंतराव कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.