शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

मराठवाड्यातील ३,५०० कोटींच्या प्लास्टिक उद्योगावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 7:18 PM

मराठवाड्यात प्लास्टिक उद्योगांतून सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होत असून, शासनाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उद्योगांवर संकट येण्याची शक्यता आहे.

- विकास राऊत  

औरंगाबाद : मराठवाड्यात प्लास्टिक उद्योगांतून सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होत असून, शासनाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उद्योगांवर संकट येण्याची शक्यता आहे. विभागात ३५० हून अधिक लहान-मोठे उद्योग असून, त्यामध्ये अंदाजे ४० हजार जणांना रोजगार मिळतो आहे. प्लास्टिक बंदीचा परिणाम या उद्योगांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक इंडस्ट्री कल्चर रुजलेले आहे. औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीमध्ये १७५ च्या आसपास उद्योग आहेत. जालन्यात ५० उद्योग असतील, तर उर्वरित मराठवाड्यात १२५ हून अधिक उद्योग असतील. या सगळ्या उद्योगांमध्ये कॉस्मो फिल्म आणि गरवारेसारख्या उद्योगांची मोठी उलाढाल आहे.

कॉस्मो फिल्म हा उद्योग सध्या २,५०० कोटींच्या उलाढालीपर्यंत गेला आहे. प्लास्टिकला पर्याय काय आहे, याबाबत शासनस्तरावर अभ्यास सुरू आहे. इतर राज्यांतील प्लास्टिकला उपलब्ध झालेल्या पर्यायांचा आढावा घेण्यासाठी अभ्यास केल्यानंतर राज्यात पूर्णत: प्लास्टिक बंदी करण्याचा विचार शासन दरबारी सुरू आहे. वास्तवत: हे करणे सध्या तरी शक्य नाही. कारण दैनंदिनीमध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मेडिकल्स, आॅटोमाबईल्स सेक्टरमध्ये प्लास्टिक प्रॉडक्टस्चा वापर मोठ्या प्रमाणात आहे. प्लास्टिक उत्पादनांवर आॅटोमोबाईल्स उद्योगांची मोठी साखळी अवलंबून आहे. बजाजसारख्या कंपनीचे १२५ व्हेंडर हे प्लास्टिक निर्मिती करणारे आहेत. पेट बॉटल्सचा ९० टक्के पुनर्वापर होतो, त्यातून स्टेपफायबरही मिळते जे कपड्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. 

प्लास्टिक उत्पादन उद्योजक भरत राजपूत यांनी सांगितले, की नेमकी कोणत्या प्लास्टिकवर बंदी आणायची आहे, हे सरकारने ठरविले पाहिजे. प्लास्टिकला पर्याय काय असावा हेदेखील समोर आणावे लागेल. मेडिकल ते आॅटोबाईल्सपर्यंत अनेक सेक्टरमध्ये प्लास्टिकचा वापर होतो आहे. मराठवाड्यात सुमारे ३५० हून अधिक उद्योग आहेत. त्यातून होणारी उलाढाल आणि रोजगाराचा आकडाही मोठा आहे. पर्यावरणाच्या विरोधातील प्लास्टिक उत्पादने बंद करण्यास हरकत नाही. 

मुंबईत असोसिएशनची बैठक प्लास्टिकचे कप, पत्रावळी, ग्लास, स्ट्रॉ, सर्व प्रकारच्या कॅरीबॅग्स, पॅकेजिंग बॅग्स, कमी मायक्रॉनच्या पेट बॉटल्स, थर्माकोल्सचा कचरा सध्या सर्वत्र दिसतो आहे. याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करण्याचा विचार करीत आहे. दरम्यान, रविवारी मुंबई, दादर येथे ‘राय’ (रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया)ची बैठक झाली. असोसिएशनने पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त सचिव सतीश गवई यांना पत्र देऊन प्लास्टिक  बंदीबाबत २२ मार्च रोजी पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक, ओल्या वस्तू पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकबाबत विवरण दिले आहे. कॅरीबॅग बंदीसाठी असोसिएशन स्वत: जनजागृती करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडाbusinessव्यवसायenvironmentपर्यावरणEmployeeकर्मचारीMIDCएमआयडीसी