दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:20 IST2026-03-24T14:16:19+5:302026-03-24T14:20:02+5:30

जामिनावर सुटलेल्या खुनी आरोपीचा हॉटेलमध्ये धुमाकूळ; तलवार उगारत दहशत, कर्मचाऱ्यांना मारहाण

Criminals clash in bar for free liquor, dunk bill of Rs 14,000, rob Rs 5,000 at swordpoint | दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले

दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले

छत्रपती संभाजीनगर : फुकट दारूच्या हव्यासातून चार गुन्हेगारांनी बारमध्ये राडा घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण करून तलवार उपसून अन्य ग्राहकांना धमकावत १४ हजार ३३३ रुपयांचे बिल बुडवून व्यवस्थापकाच्या खिशातून ५ हजार रुपये काढून घेत खुनाची धमकी दिली. २१ मार्च रोजी रात्री १ वाजता लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये ही घटना घडली. विकास रहाटवाडे व सारंग तरमगे (रा. कांचनवाडी) असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह त्यांचे दोन अन्य साथीदार घटनेनंतर पसार झाले आहेत.

आकाश कांतीलाल गोलेच्छा (२९, रा. राजाबाजार) हे सदर बारमध्ये व्यवस्थापक आहेत. २१ मार्च रोजी ते कर्तव्यावर हजर असताना आरोपी विकास, सारंग व अन्य दोघे त्यांच्या बारमध्ये गेले. दारूची ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी अचानक अमराठी कर्मचाऱ्यांवरून वाद घातला. कंबरेला लावलेली तलवार काढून बारमध्ये फिरवत आरडाओरड केली. आकाश यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये रक्कम हिसकावून घेतली. अन्य ग्राहकांना धमकावत कर्मचारी, व्यवस्थापकांना नाहक माफी मागण्यास लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

१४ हजारांची दारू घेऊन पसार
आरोपी विकास, सारंग व अन्य दाेघांनी मिळून बारमधून तब्बल १४ हजार ३३३ रुपयांची दारू खरेदी केली. काही वेळ बारमध्ये राडा घालून ती दारू तशीच घेऊन थेट कारमध्ये (एमएच -२०-ईएक्स-१४३१) बसून पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे तपास करत आहेत.

२०२१ मध्ये मित्राची केली होती हत्या
तरंगेवर यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर विकास रहाटकर (रा. कांचनवाडी) याने संदीप ऊर्फ गुज्जर मुळेकर याच्यासोबत मिळून १२ सप्टेंबर, २०२१ रोजी त्याचा मित्र महेश काकडे याची डोके ठेचून क्रूर हत्या केली होती. त्या गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर सुटताच त्याने पुन्हा परिसरात दहशत माजवणे सुरू केले.

Web Title : शराब के लिए बार में अपराधियों का हंगामा; लूटपाट की वारदात

Web Summary : चार अपराधियों ने मुफ्त शराब के लिए बार में आतंक मचाया, कर्मचारियों पर हमला किया, तलवार लहराई और ₹5,000 लूटे। उन्होंने ₹14,333 का बिल भी नहीं चुकाया। एक पर पहले हत्या का आरोप था।

Web Title : Criminals Wreak Havoc in Bar for Liquor; Robbery Ensues

Web Summary : Four criminals terrorized a bar for free liquor, assaulting staff, brandishing a sword, and robbing ₹5,000. They fled without paying the ₹14,333 bill. One had a prior murder charge.