टोळीला पिस्तूल पुरवून गोळीबाराचा रचला कट, सूत्रधारांच्या शोधात पथक रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:50 IST2026-01-21T13:49:14+5:302026-01-21T13:50:25+5:30

मुकुंदवाडी गोळीबार : सात हल्लेखोरांना २३ जानेवारीपर्यंत पाेलिस कोठडी; पाेलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी शुभम जाटच्या कुटुंबावर स्वतंत्र गुन्हा

Criminal Shubham Jat: A plot to shoot was hatched by supplying pistols to the gang, a team has been sent in search of the ringleaders | टोळीला पिस्तूल पुरवून गोळीबाराचा रचला कट, सूत्रधारांच्या शोधात पथक रवाना

टोळीला पिस्तूल पुरवून गोळीबाराचा रचला कट, सूत्रधारांच्या शोधात पथक रवाना

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल व मुलीच्या वादातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये झालेल्या गोळीबार हा नियोजनबद्ध कट हाेता. कुख्यात गुन्हेगार शुभम भिकूलाल जाट (३०) याला पिस्तूल पुरवून अजय कागडा याच्या हत्येचे नियोजन आखण्यात आले होते. पुंडलिकनगर पोलिसांनी आता त्याही गुन्हेगारांचा शोध सुरू केला असून संपूर्ण टोळींचा आरोपींमध्ये समावेश करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगिततले.

कुख्यात गुन्हेगार अजय कागडाचे नातेवाईक सचिन लाहोट (रा. मुकुंदवाडी) यांच्या घरावर जाटने टोळीसह सशस्त्र हल्ला चढवला. १९ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या या घटनेत जाटने दोन वेळेस गोळीबार केला. या घटनेमुळे मुकुंदवाडी, पुंडलिकनगर परिसरातील संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यात अटकेत असलेल्या जाटसह मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांना मंगळवारी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी न्यायालयात हजर केले. आरोपींना पिस्तूल कोणी पुरवले, कट आखण्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, गोळीबार करण्यासाठी आरोपींचा आणखी काही उद्देश होता का, याचा तपास करायचा असल्याने सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.

जाटचे कुटुंबही आता पोलिस रेकॉर्डवर
शुभम जाटचा भाऊ महावितरणमध्ये शासकीय कर्मचारी आहे. कुटुंबासह तो आलिशान रो-हाऊसमध्ये राहतो. २०१२ मध्ये गुन्हेगारी जगतात सक्रिय झालेल्या जाटवर १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपासून तो हैदराबादमध्ये होता. नुकताच शहरात येत त्याने थेट गोळीबार करत पोलिसांना आव्हान दिले. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याच्या कुटुंबाने धक्काबुक्की करून हल्ला केला. शिवाय, शुभमला पळून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या साथीदारांसह भाऊ कैलास भिकूलाल जाट, बहीण पूनम भिकूलाल जाट, आई सुखना, पत्नी नेहा यांच्यावरही सातारा पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता कुटुंबही पाेलिसांच्या रेकॉर्डवर आले आहे.

मोक्काची तयारी, शुभमच्या संपर्कातील प्रत्येकावर कारवाई
गोळीबाराच्या घटनेची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. शुभम, अटकेतील साथीदारांव्यतिरिक्त त्याच्या संपर्कात असलेले गुन्हेगार, मित्रांवरही आता पोलिस कठोर कारवाईची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर शुभमची टोळी सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत असते. सायबर पोलिसांकडून मात्र त्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही, हे विशेष. सोमवारच्या घटनेमुळे मात्र पोलिसांनी आता या सर्वच टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्काच्या कारवाईसाठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title : गिरोह ने पिस्तौल की आपूर्ति की, गोलीबारी की योजना बनाई; सरगनाओं को ढूंढने के लिए टीम रवाना

Web Summary : मोबाइल और लड़की के विवाद में अजय कागड़ा को निशाना बनाकर एक सुनियोजित गोलीबारी की गई। पुलिस शुभम जाट और साजिश में शामिल अन्य लोगों को पिस्तौल की आपूर्ति करने वालों की जांच कर रही है। जाट परिवार भी पुलिस को बाधित करने के लिए जांच के दायरे में है।

Web Title : Gang Supplied Pistol, Planned Shooting; Team Deployed to Find Masterminds

Web Summary : A planned shooting, stemming from a dispute over a girl and mobile, targeted Ajay Kagada. Police are investigating who supplied the pistol to Shubham Jat and others involved in the conspiracy. The Jat family is also under scrutiny for obstructing police.