कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 10:08 IST2023-05-16T10:07:31+5:302023-05-16T10:08:52+5:30

यावेळी बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. तसेच आयोजकांनी चिथावणी दिली.

Crime against BJP office bearers including Kalicharan Maharaj | कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे  शनिवारी रात्री आठ वाजता हिंदू जनजागरण सभेच्या वतीने आयोजित सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी १४ मे रोजी रात्री कालीचरण महाराजांसह भाजप व आरएसएसच्या चार पदाधिकाऱ्यांवर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे १३ मे  रोजी कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत रुद्राक्ष वाटप करण्यात आले. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. तसेच आयोजकांनी चिथावणी दिली.

Web Title: Crime against BJP office bearers including Kalicharan Maharaj