वीजचोरी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे

By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:21:24+5:302014-07-21T00:24:49+5:30

रांजणी : परिसरातील रांजणीवाडी, करडगाव, जिरडगाव व येवला येथे धाडी टाकून वीज कंपनीच्या तारेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ४० आकडेबहाद्दरांना वीजचोरी करताना पकडले.

Crime against 40 people for power bills | वीजचोरी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे

वीजचोरी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी वीज केंद्राच्या पथकाने परिसरातील रांजणीवाडी, करडगाव, जिरडगाव व येवला येथे धाडी टाकून वीज कंपनीच्या तारेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ४० आकडेबहाद्दरांना वीजचोरी करताना पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले असून, १,९३,५३१ रुपये दंड आकारला आहे.
रांजणी वीज कंपनीचे अभियंता एस.पी. पाडसवान, तंत्रज्ञ एन.जे. पवार, एल.के. सुरडकर, आर.एस. गर्जे, एस.एस. सोनुने आदी पथकात होते. या पथकाने रांजणीवाडी येथे २० जणांना आकडे टाकून वीजचोरी करताना पकडले. त्यात गुलाब कुहिरे, दामोधर पाटोळे, मारोती जाधव, अर्जुन पाटोळे, देवराव यादव, गणेश जासूद, अंगद कोकाटे, बाळाभाऊ जासूद, आसाराम थिटे, अशोक रणमोडे, सुनील पाटोळे, विष्णू पाटोळे, शामराव शिंदे, गणेश थिटे, विष्णू चव्हाण, उद्धव नाटकर, गुलाब पाटोळै, झुंगराजी जाधव, सर्जेराव शिंदे, जनार्दन थिटे यांच्या विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करून ४० हजार रुपये दंड आकारला आहे. करडगाव येथील ९, जिरडगाव येथील ६, येवला ४ जणांचा समावेश आहे. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून कंपनीचे कर्मचारी वीजचोरीविरूद्ध कारवाई करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime against 40 people for power bills