शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्याचे न्यायालयाचे आदेश

By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST

रेणापूर : उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाप्रमाणे विहीत मुदतीत रेणापूर ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी,

रेणापूर : उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाप्रमाणे विहीत मुदतीत रेणापूर ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी, असे रेणापूरच्या ग्रामपंचायतीला एका पत्रान्वये कळविल्यामुळे अतिक्रमणधारक व्यापार्‍यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. रेणापूर भूखंड वाटप, अतिक्रमण व इतर विषयाची गांभीर्याने चौकशी व्हावी, दोषींवर कार्यवाही करावी, यासह अन्य मागण्यांसाठी रेणापुरातील समाजसेवक अशोक तेरकर, अनुरथ बस्तापुरे, सागर तोडकरी, स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे व इतर नागरिकांनी २३ जानेवारी २०१०, २३ जानेवारी २०११, १ मे २०११ अशी बेमुदत उपोषणे केली. प्रत्येक उपोषणाच्या वेळी प्रशासनाने उपोषणकर्त्यांना लेखी अहवाल व आश्वासने देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले. रेणापूर भूखंडाची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत, विधानसभेत व शासनदरबारी विशेष दखल घेतली गेली. परंतु, यात उपोषणकर्त्यांच्या मागणीला प्राधान्यक्रम मिळाला नाही. प्रशासनाने अनेकवेळा रेणापूर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कळविले. त्यात भूखंडाबाबत ग्रामपंचायतीने कार्यवाही न करता केवळ टोलवा टोलवी केली व उपोषणकर्त्यांच्या मागणीला बगल दिली. ग्रामपंचायतीकडून कसलीच कार्यवाही होत नाही म्हणून अशोक तेरकर यांनी महाराष्ट्र शासन व संबंधितांविरुद्ध रिट याचिका क्र. ५२५२/१० अन्वये भूखंडाचे प्रकरण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून चार महिन्यातल्या कामाचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष़़़ त्याप्रमाणे रेणापूर पंचायत समितीने रेणापूर ग्रामपंचायतीला उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्र्यवाही करावी म्हणून ३ मार्च २०१४, २८ फेब्रुवारी २०१३, २९ मार्च २०१४, ७ मे २०१४, १५ मे २०१४ या तारखांना कळविले. परंतु, ग्रामपंचायतीकडून अद्याप कसलीच कार्यवाही झाली नाही. परवा १५ मे २०१४ रोजी परत गटविकास अधिकारी शाम पटवारी यांनी रेणापूर ग्रा.पं.ला पत्र पाठवून न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा बजावून अतिक्रमण काढण्याची सूचना केली आहे. ग्रा.पं. काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.