शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

पक्ष्यांच्या खाद्यासाठी हे 'दाम्पत्य’ महिनाकाठी करते ५० किलो धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 3:04 PM

महिन्याकाठी ते पक्ष्यांसाठी २५ किलो बाजरी आणि २५ किलो ज्वारी खरेदी करतात.

ठळक मुद्देप्राणी-पक्ष्यांसाठी केली दाणापाणी आणि निवाऱ्याची सोय! संकटसमयी जखमी झालेले कुत्रे, मांजरींना पुन्हा बरे करून त्यांना जीवदान दिले आहे.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : स्वत:साठी प्रत्येकच जण जगतो, आपल्याला दुसऱ्यांसाठी जगता आले पाहिजे, या विचाराला अनुसरून जगणारे फार कमी लोक जगात आहेत. प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकविणारे लोकही क्वचितच पाहायला मिळतात. शहरातील ‘गिरी दाम्पत्य’ यांपैकी एक़ गेल्या ७-८ वर्षांपासून ते पक्षी, प्राणी यांच्यासाठी रक्षणकर्ते म्हणून काम करीत आहेत. प्राणी-पक्ष्यांसाठी त्यांनी दाणापाण्याची, निवाऱ्याची सोय केली असून, तसेच संकटसमयी जखमी झालेले कुत्रे, मांजरींना पुन्हा बरे करून त्यांना जीवदान दिले आहे. 

शहराच्या एन-१ परिसरातील भक्तीनगरमध्ये रहिवासी असलेले दाम्पत्य डॉ. प्रल्हाद किशन गिरी आणि स्मिता प्रल्हाद गिरी हे पक्षी-प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रल्हाद गिरी ७ ते ८ वर्षांपासून घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवतात. महिन्याकाठी ते पक्ष्यांसाठी २५ किलो बाजरी आणि २५ किलो ज्वारी खरेदी करतात. घराच्या गच्चीवर त्यांनी या पक्ष्यांना खाद्य म्हणून काही भांड्यांमध्ये पाणी आणि धान्य ठेवतात. पक्षी साधारण दुपारी १२ च्या सुमारास गच्चीवर येऊन मनसोक्त खाद्य खातात, पाणी पितात तसेच पाण्यात डुंबून मस्तपैकी आंघोळही करतात. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी ते कुठे थंडावा मिळेल, याचा शोध घेत घराकडे येतात.

त्यासोबतच त्यांच्या पत्नी स्मिता गिरी या देखील वयाच्या ८ व्या वर्षापासून कुत्री, मांजरं यांच्यासाठी काम करतात. एखादा कु त्रा रस्त्यात जखमी अवस्थेत सापडल्यास त्या ताबडतोब घरी आणून त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा पूर्ववत करतात. कुत्र्यांच्या जाती टिकून राहाव्यात म्हणून त्या प्रयत्नशील आहेत. रस्त्यात सापडलेली अशी अनेक छोटी कु त्र्यांची पिले त्यांनी मोठी करून कॉलनीत दत्तक दिली आहेत. संजय इंगळे यांच्या ‘आला’ या संस्थेसोबत त्या काम करतात. या संस्थेतर्फे ५० कुत्री दत्तक देण्यात आली आहेत. बेवारस कुत्र्यांना रस्त्यात झालेल्या जखमा, अपघातामुळे झालेली हानी दूर करण्यासाठी हे दाम्पत्य सेवा देतात. त्यांच्या या छंदातून ते सर्वांना दुसऱ्यांसाठी जगण्याचा संदेश देतात.

कुत्री दत्तक देण्यासाठी हवे ‘शेल्टर’गिरी सांगतात,‘आम्ही कित्येक दिवसांपासून मोकाट असलेली कुत्री, त्यांची पिले यांच्यासाठी एका शेल्टरची मागणी महानगरपालिकेक डे केली आहे. मात्र, अद्याप आम्हाला मिळालेले नाही. रस्त्यांवर मोकाट असलेल्या कुत्र्यांना शेल्टरमुळे छत मिळेल, त्याशिवाय कुत्र्यांच्या जाती जपून ठेवता येतील, पिलांना मोठे करून त्यांना योग्य घरी दत्तकही देता येईल.                      

स्मिता गिरी सांगतात,‘सध्या विदेशातील कुत्री, मांजरे हे घरोघरी पाळली जातात. स्वदेशी कुत्री आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसतात, कुठेतरी रस्त्यातील अपघातात सापडतात. त्यामुळे स्वदेशी कुत्र्यांची जात हळूहळू नेस्तनाबूत होत आहे. शिवाय शिवाय विदेशी कुत्री घरात पाळली की, त्यांचे केस घरात पडतात, त्यामुळे ते आपल्याला हानिकारक ठरते. स्वदेशी कुत्री घराबाहेर राहू शकतात. ते प्रामाणिक आणि माणसांवर प्रेम करणारे असतात.’ 

प्राणी-पक्ष्यांना द्या प्रेमाची वागणूक                                    प्राणी, पक्षी हे पर्यावरणातील एक घटक आहेत. त्यांच्याशिवाय पर्यावरणाची साखळी पूर्ण होत नाही. त्यांचे प्रमाण कमी झाले तर पर्यावरणाचा समतोल ढासळतो. त्यामुळे देशी कुत्री-मांजरांचे प्रमाण वाढले पाहिजे. ते आपल्याला नि:स्वार्थ प्रेम देतात. त्यांना केवळ माणसांकडून मिळणाऱ्या प्रेमाची अपेक्षा असते. ते देखील तेवढ्याच प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने तुमच्यासोबत राहतील.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद