देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर

By साहेबराव हिवराळे | Published: September 29, 2023 04:02 PM2023-09-29T16:02:18+5:302023-09-29T16:03:19+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती सध्या २४ इंचाची झाली असून लोकसभा निवडणुकांपर्यंत ती २० इंचाची होईल

Country on the verge of becoming Manipur, Godhra; After Diwali there will be chaos everywhere: Prakash Ambedkar | देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर

देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: सरकारच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव आहे. देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी  मतदान होईपर्यंत शांत रहा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना यावेळी केले. ते शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, आरक्षणावर रान उठवून जनतेची डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे. हिंदुच्या सरकारमध्ये हिंदूवरच हल्ला चढविला जाणार असल्याने मुस्लीमच नव्हे तर शिख, जैन देखील यात भरडले जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवल्या जातो. मग आता भाजप तर लुटारूची गँगच आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष  प्रभाकर बकले, योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, रूपचंद गाडेकर आदींची उपस्थिती होती.

५६ इंच छाती २० इंच होईल 
एक कंगाल देश आपल्यावर गोळीबार करतो. आपण त्यावर काहीच करत नाही. फक्त पाहत राहतो. इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे ४ ते ५ तुकडे केले असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती सध्या २४ इंचाची झाली असून लोकसभा निवडणुकांपर्यंत ती २० इंचाची होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Web Title: Country on the verge of becoming Manipur, Godhra; After Diwali there will be chaos everywhere: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.