शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची उत्पादकता ६७५ किलोने घटली

By admin | Updated: May 17, 2014 01:05 IST

रामेश्वर काकडे ल्ल नांदेड गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे कापसाची उत्पादकता ६७५ किलोने तर सोयाबीनची २४७ किलोने घटली

रामेश्वर काकडे ल्ल नांदेड गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे कापसाची उत्पादकता ६७५ किलोने तर सोयाबीनची २४७ किलोने घटली. अशी माहिती कृषी विभागाने घेतलेल्या पीककापणी प्रयोगावरुन समोर आली आहे. पिके काढणीला आल्यानंतर अवकाळी पाऊस झाला. याचा फटका पिकांना बसल्याने खरिपाची पिके हातची गेली. परिणामी शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन पीककापणी प्रयोग घेण्यात येतात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले की, कमी झाले हे चित्र स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेतलेल्या पीक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो आले होते. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे हेक्टरी उत्पादकता वाढली होती, परंतु यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने उत्पादकतेत घट झाली आहे. सोयाबीन-कापसाच्या उत्पादकतेत वाढ २०११-१२ मध्ये कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले. तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर आले. गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादकता अशी- ज्वारी १०७३ किलो, तुर ६४८ किलो, मूग ३७२ किलो, उडीद ४२२ किलो, सोयाबीन १००० किलो, कापूस २३६ किलो, ऊस ६५ मे.टन याप्रमाणे उत्पादकता आली आहे. ज्वारीचे ८३६ तर तुरीचे ६५६ किली उत्पादन सन २०१३-१४ या वर्षात ज्वारी प्रतिहेक्टर ८३६ किलो, तूर ६५६ किलो, मूग ५२५ किलो, उडीद ५६७ किलो, सोयाबीन १२९७ किलो, कापूस २७१ किलो, ऊस प्रतिहेक्टर ६९ मे. टन याप्रमाणे उत्पादन आले. तर गेल्यावर्षी २०१२-१३ मध्ये कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो तर सोयाबीनचे १५ क्विंटल ४४ किलो निघाले होते. यामुळे यंदा कापूस, सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आगामी वर्षात खरिपाची उत्पादकता वाढण्याचा अंदाज २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता अपेक्षित आहे. ज्वारी प्रतिहेक्टर ११८० किलो, तूर ७१३ किलो, मूग ५८०, उडीद ६२५ किलो, सोयाबीन १७०३ किलो, कापूस ३२५ किलो, ऊस ७२ मे.टन. याप्रमाणे उत्पादकता अपेक्षित आहे.